Nissan मोटर इंडियाने आज आपल्या नव्या सी-सेगमेंट एसयूव्हीचे नाव जाहीर केले आणि याच्या डिझाइनची पहिली झलक सादर केली. ही कार(car) म्हणजे ‘ऑल-न्यू Nissan Tecton’– जी भारताच्या “वन कार, वन वर्ल्ड” या धोरणाखालील दुसरी एसयूव्ही ठरणार आहे.

‘टेक्टॉन’ – नावातच दडलेली कारागिरीची ओळख
‘टेक्टॉन’ हे नाव ग्रीक भाषेतून आले असून त्याचा अर्थ “कारागीर” किंवा “आर्किटेक्ट” असा होतो. हे नाव निसानच्या अचूक इंजिनिअरिंग, गुणवत्तापूर्ण कारागिरी आणि जीवन समृद्ध करणाऱ्या नाविन्यपूर्णतेच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. ही एक दमदार, प्रीमियम आणि फीचर्सपूर्ण एसयूव्ही आहे जी अभियांत्रिकी उत्कृष्टता, हाय परफॉर्मन्स आणि वेगळेपणाचा डिझाइन दृष्टिकोन दर्शवते.
नव्या युगासाठी नव्या डिझाइनची प्रेरणा
नवीन टेक्टॉनचे डिझाइन प्रतिष्ठित निसान पेट्रोल या दीर्घकाळापासून लोकप्रिय असलेल्या एसयूव्हीवर आधारित आहे. पेट्रोलच्या दमदार डीएनएला आधुनिक भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांशी जोडून तयार करण्यात आलेली ही कार(car), सौंदर्य, विश्वासार्हता आणि तांत्रिक नाविन्य यांचा अद्भुत कॉम्बिनेशन आहे.
समोरच्या बाजूस एक पॉवरफूल बॉनेट, विशिष्ट सी-आकाराचे एलईडी हेडलॅम्प्स, आणि मजबूत खालचा बंपर याचा दमदार लूक अधोरेखित करतो. बाजूच्या प्रोफाइलमध्ये मस्क्युलर कट्स आणि डबल-सी आकाराचे डिझाइन दिसून येते, ज्यात हिमालयाने प्रेरित पर्वतरांगा डिझाइनमध्ये सूक्ष्मतेने उमटवण्यात आल्या आहेत. मागच्या बाजूस लाल रंगाच्या लाईटबारसह ‘सी-आकाराचे’ डायनॅमिक टेललॅम्प्स दिले असून, त्याखाली ठळकपणे Tecton नेमप्लेट दिसते.
प्रमुख अधिकारी काय म्हणाले?
निसान मोटर कंपनी लिमिटेडचे कॉर्पोरेट कार्यकारी उपाध्यक्ष अल्फोन्सो अल्बाइस म्हणाले, “ऑल-न्यू निसान टेक्टॉन ही आमच्या प्रसिद्ध पेट्रोलपासून प्रेरित असून, ती आजच्या आधुनिक भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि सौंदर्यदृष्टी लक्षात घेऊन डिझाइन केली आहे. ही कार भारतात आणि जगभरात नवा बेंचमार्क निर्माण करेल.”

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “निसान टेक्टॉन ही आमच्या भारतातील डेव्हलपमेंटचा पुढचा अध्याय आहे. याच्या दमदार प्रेझेन्स, प्रीमियम इंटिरिअर आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ती सी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये उत्साह निर्माण करेल.”
उत्पादन आणि लाँचिंग
Tecton चे उत्पादन चेन्नई येथील निसानच्या प्लांटमध्ये, रेनॉल्ट अलायन्स पार्टनरसोबत भागीदारीत केले जाईल. ही कार भारताबरोबरच निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाणार आहे. निसान मोटर इंडिया आपल्या डीलर नेटवर्कचा विस्तार आणि उत्पादन पोर्टफोलिओचा विकास या दोन्ही दिशांनी वेगाने पुढे जात आहे.
निसान टेक्टॉनचे पूर्ण लाँचिंग आणि सेल्स 2026 मध्ये होणार आहे. ही कार केवळ एक नवी एसयूव्ही नसून, भारतात निसानच्या प्रेझेन्सला नवा वेग देणारी ठरेल.कंपनीकडून, या कारच्या किमतीबाबत कोणतीही माहिती पुरवण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’
आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!
सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?