बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. इंडियन ऑइल (Indian Oil)कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ५२३ अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारिक आज आहे.

ज्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अद्याप भरतीसाठी अर्ज केलेला नाही ते अर्ज विंडो बंद होण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट iocl.com किंवा अप्रेंटिसशिप पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकतात.चला जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया काय?
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सरकार-मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या शिवाय १२ वी उत्तीर्ण, पदवीधर आणि डिप्लोमा देखील विशिष्ट पदानुसार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया
-गुणवत्तेचा आधार
-कागदपत्र पडताळणी
-वैद्यकीय परीक्षा
असे करा अर्ज
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि खालील चरणांचे अनुसरण करावे.
-उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, iocl.com ला भेट द्यावी.
-होमपेजला भेट दिल्यानंतर, संबंधित लिंकवर क्लिक करा.
-एक नवीन पेज उघडेल; नोंदणी करा आणि लॉगिन करा.
-त्यानंतर, फॉर्ममध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती प्रविष्ट करा.
-सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य आकारात अपलोड करा.
-त्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
-शेवटी, भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
-कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती
कॅनरा बँकेने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर केली आहे(Indian Oil). अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर अशी आहे. उमेदवार कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.canmoney.in/careers ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. कॅनरा बँकेत अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर अशी आहे. शैक्षणिक पात्रता ग्रेजुएशनची पदवी आवश्यक असणे गरजेचे आहे.या अप्रेंटिसशिप साठी प्रति महिना १५,००० रुपये आहे.
हेही वाचा :
‘या’ तेलामुळे रक्ताच्या नसा कधीच बंद पडणार नाही, हार्ट अटॅकचा धोका राहील दूर
पाऊस परतीच्या वाटेवर लागताच सूर्य तळपला; कुठं बसणार ऑक्टोबर हिटचा चटका?
शिवाजी पार्कात प्रॅक्टिस करताना रोहित शर्मा जवळच्या व्यक्तीवरच भडकला! Video Viral