त्रिपुरामध्ये घडलेली १४ महिन्यांच्या चिमुकलीवरील बलात्कार(rape) आणि हत्येची घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली आहे. शनिवारी रात्री ही अमानवीय घटना घडली असून, आरोपी दुसरा कोणी नसून त्या निष्पाप बालिकेचा सख्खा आजोबा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय जयनल उद्दीन या व्यक्तीने आपल्या नातीवर आधी बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह शेतात पुरला. रविवारी त्रिपुरा पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपीला आसाममधील श्रीभूमी परिसरातील नीलम बाजार येथून अटक केली.

ही हृदयद्रावक घटना त्या वेळी घडली जेव्हा चिमुकली आपल्या आईसोबत मामाच्या घरी गेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास आजोबा मुलीला घेऊन बाहेर गेले, मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला पण मुलगी सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता आजोबाच्या घराजवळील शेतात ताज्या मातीचा खड्डा दिसून आला. पोलिसांनी तो भाग खोदला असता, त्यात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.

शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर आलं — त्या निष्पाप बालिकेवर अत्याचार(rape) झाल्यानंतर तिची निर्दयतेने हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला असून, या अमानवी कृत्याने पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे.

हेही वाचा :

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला हवीये बंदूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा मसाला भरलेली स्टफ्ड इडली….

आज तुमचं भविष्य काय सांगतं…..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *