राज्य सरकारच्या(government) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, आता या योजनेत लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना आवाहन करत ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारने १८ सप्टेंबर रोजी या संदर्भात परिपत्रक जारी केले असून, लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय नोव्हेंबर महिन्याचा हप्ता थांबविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी ई-केवायसीसाठी वेबसाइटवर गर्दी केली असली, तरी काही ठिकाणी साईट डाऊन होणे, इंटरनेट समस्या किंवा आवश्यक कागदपत्रांचा अभाव यामुळे अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे, ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांच्या बाबतीत अद्याप सरकारने स्पष्ट धोरण जाहीर केलेले नाही.
दरम्यान, राज्य सरकारने (government)दिवाळीपूर्वीच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ₹1,500 रुपयांचा हप्ता जमा केला असून, त्यामुळे ग्रामीण महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही महिलांनी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदविल्याशिवाय ई-केवायसी पूर्ण केल्याची चर्चा आहे. अशा महिलांना पुढील हप्ता मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास जबाबदारी लाभार्थी महिलेची असेल, सरकारची नाही.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची पद्धत:
1️⃣ ladkibahin.maharashtra.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्या.
2️⃣ लॉगिन करून “ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा” या पर्यायावर क्लिक करा.
3️⃣ तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
4️⃣ “Send OTP” वर क्लिक करून आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका.
5️⃣ आता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करा.
6️⃣ जात प्रवर्ग निवडा आणि प्रमाणित घोषणापत्रावर टिक करा.
7️⃣ सर्व माहिती तपासून “Submit” करा.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली” असा संदेश दिसेल. राज्य सरकारच्या निर्देशानुसार, प्रत्येक वर्षी जून महिन्यात e-KYC करणे अनिवार्य आहे. या नियमाचे पालन न केल्यास पुढील कोणत्याही लाभासाठी पात्रता रद्द होऊ शकते.
हेही वाचा :
आजोबाकडून १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार…
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला हवीये बंदूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा मसाला भरलेली स्टफ्ड इडली….