कन्नड चित्रपटसृष्टी आणि ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते राजू तालीकोटे यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या (heart attack)तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.राजू तालीकोटे हे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. रविवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या दिवसाचे काम पूर्ण केले. त्यानंतर त्यांना अचानक खांद्यात तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि काही वेळातच श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून त्यांना मध्यरात्री मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू यांना यापूर्वीही दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. तिसऱ्यांदा आलेल्या या तीव्र झटक्याने (heart attack)त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी नुकतेच दोन दिवसांचे शूटिंग पूर्ण केले होते, यावर विश्वास बसत नाही, अशी भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.राजू तालीकोटे हे ‘बिग बॉस कन्नड’मुळे घराघरात पोहोचले होते आणि त्यांच्या विनोदी स्वभावाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. गेल्या काही वर्षांत ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमधील अनेक स्पर्धकांचे अकाली निधन झाले आहे किंवा ते गंभीर आजारांशी झुंज देत आहेत. यात सिद्धार्थ शुक्ला , सोनाली फोगाट , शेफाली जरीवाला आणि स्वामी ओम यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

तर दुसरीकडे, हिना खान आणि दीपिका कक्कर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्री कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. राजू तालीकोटे यांच्या निधनाने (heart attack)या दुर्दैवी घटनांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
वेस्ट इंडीजवरील विजयानंतर WTC Points Table मध्ये बदल…
51वर्षीय मलायका अरोराच्या हॉटनेससमोर रश्मिका मंदाना फीकी ठरली…
मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय, राज्याचा चेहरामोहराच बदलणार…