हरियाणाची प्रसिद्ध डान्सर(dancer) आणि बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सपना चौधरीच्या स्टेज शोदरम्यान कोरबा जिल्ह्यात मोठा गदारोळ झाला. घटना १२ ऑक्टोबर, रविवार रात्री घडली. संध्याकाळी ९ वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात फॅन्स स्टेजवर चढून नाचू लागले आणि पैसे फेकू लागले. सपना चौधरीने लोकांना स्टेजवरून उतरून पैसे फेकू नये असे सांगितले, परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

सपना चौधरी (dancer)शो सोडून रिसॉर्टमध्ये आपल्या खोलीत गेली, मात्र काही प्रेक्षक तिच्या मागोमाग रिसॉर्टपर्यंत पोहोचले आणि खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिसॉर्टमध्ये सीसीटीव्ही डीव्हीआर आणि १० हजार रुपये लुटले गेले, तसेच सपना आणि तिच्यासोबत आलेल्या स्टाफला धमक्यांचे तसेच शिव्यांचे तोंड द्यावे लागले.
रिसॉर्टच्या मॅनेजरने अमित नवरंगलाल अग्रवाल, अनिल द्विवेदी, युगल शर्मा आणि सुजल अग्रवाल यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल द्विवेदी म्हणाले की, तो फक्त सपना चौधरीला शुभेच्छा द्यायला गेला होता, परंतु त्यावेळी रिसॉर्टच्या स्टाफकडून त्यांच्यावर गैरवर्तन करण्यात आले.सध्या पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी आहे.
हेही वाचा :
वेस्ट इंडीजवरील विजयानंतर WTC Points Table मध्ये बदल…
51वर्षीय मलायका अरोराच्या हॉटनेससमोर रश्मिका मंदाना फीकी ठरली…
मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय, राज्याचा चेहरामोहराच बदलणार…