दिवाळीचा सण म्हणजे सर्वत्र दिव्यांची रोशनाई, नवीन खरेदी, फराळ आणि फटाक्यांची मजा… दिवाळीत फटाके नाही असं होऊच शकत नाही. काही लोक फटाक्यांची मजा लुटतात तर काही फटाक्यांसोबत भलतीच मस्ती करु पाहतात. आता ही मस्ती आपल्याला महागातही पडू शकते. सोशल मिडियावर अशा(mouth) अनेक घटनांचे व्हिडिओज नेहमीच शेअर होतात आणि आताही इथे एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात माणसाने जे केलं ते पाहून सर्वांचे होश उडाले. अंगाचा थरकाप उडवून टाकणाऱ्या या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

फटाके हे रस्त्यावर किंवा कोणत्या मोकळ्या जागी पेटवले जातात. फटाके पेटवताना नेहमी एक अंतर ठेवले जाते, जेणेकरुन आपल्याला कोणता धोका होऊ नये. पण आताच्या व्हिडिओत मात्र तरुणाने अनोखाच पराक्रम करुन दाखवला. अहो, अंतर तर सोडाच, त्याने थेट आपल्या तोंडातच (mouth)फटाके फोडण्याचा पराक्रम केला. व्हिडिओमध्ये माणूस एका रस्त्यावर उभा असल्याचे दिसते, त्याच्या तोंडात त्याने फटाका पकडलेला असतो आणि लाईटर तोंडाकडे नेत तो हळूच हा फटाका पेटवतो. अखेर होणार काय, फटाक्याचा ज्वलंत जाळ, त्याच्या तोंडातून बाहेर पडतो जे पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुले राहतात. तरुण मात्र जशाचा तशा स्तब्ध उभा राहतो. व्हिडिओत पुढे काय घडलं ते स्पष्ट झाल नाही पण काही सेकंदाच्या या दृश्यांनी यूजर्सना मात्र हादरवून सोडलं.
हा व्हायरल व्हिडिओ @_imranjan11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा सिगारेट कमी पडते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कंटेंट असं बनवा की कुणी कॉपीच करू शकणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही त्याची शेवटची दिवाळी असेल”.
हेही वाचा :
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन…
सपना चौधरीच्या शोमध्ये राडा, खोलीत घुसून गोळ्या घालण्याची दिली धमकी…
वेस्ट इंडीजवरील विजयानंतर WTC Points Table मध्ये बदल…