सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं, बऱ्याचदा सुचत नाही. (breakfast)अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोहा नगेट्स बनवून खाऊ शकता. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात सतत कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा (breakfast)आल्यानंतर मुलं विकतचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच विकतचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. बाहेर मिळणारे चटपटीत पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागले तरीसुद्धा या पदार्थांच्या सेवनामुळे मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात पोहा नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पोहे चवीला अतिशय सुंदर लागतात. याशिवाय पोहे सहज पचन देखील होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात मुलांना कधीतरी पोहे सुद्धा खाण्यास द्यावे. बऱ्याचदा तुम्ही बाजारात विकत मिळणारे चिकन नगेट्स खाल्ले असतील, पण आम्ही तुम्हाला पोह्यांपासून नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कृती.
कृती:
पोहे
उकडलेला बटाटा
कांदा
हिरवी मिरची
आलं लसूण पेस्ट
कोथिंबीर
तांदळाचे पीठ
बेसन
मीठ
तेल
लाल तिखट
हळद
कृती:
पोहा नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाण्यात ३ ते ४ मिनिटं पोहे भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून पोहे चाळणीवर ठेवून द्या.
मोठ्या भांड्यात मॅश केलेला बटाटा, पोहे, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, धणे, आले-लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, बेसन, तांदळाचे पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
हातांना तेल लावून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे नगेट्स बनवून ठेवा. त्यानंतर कढईमध्ये गरम तेलात नगेट्स दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चविष्ट पोहा नगेट्स. हा पदार्थ सॉससोबत अतिशय सुंदर लागेल.
हेही वाचा :
‘भूत कोला’ पण सण देवाचा…
वेळीच सावध होऊन घ्या उपचार
आजचा बुधवार राशींसाठी भाग्यशाली! श्रीविठ्ठलाच्या कृपेने अडचणी होतील दूर,