दिवाळी मोठ्या सुट्टीनंतर (holidays)शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरु झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या वर्षाला संपायला अवघ्ये दोन महिने बाकी असताना, नोव्हेंबर महिन्यातील 11 आणि 14 नोव्हेंबरला शाळा आणि कॉलेजला पुन्हा सुट्टी मिळणार आहे. एवढंच नाही तर सरकारी कार्यालयाला सुट्टी असणार आहे. प्रत्येक राज्याच्या सुट्ट्या त्यांच्या राज्यातील घडामोडीवर ठरला जातात. आता 11 आणि 14 नोव्हेंबरला सुट्टी का असणार आहे? आणि कोणत्या राज्याला जाणून घ्या.

जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीमुळे 11 आणि 14 नोव्हेंबर रोजी शाळा आणि कार्यालये बंद राहतील, अशी घोषणा सरकारने केली आहे. हैदराबादचे जिल्हाधिकारी हरिचंदन दसारी यांनी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यालये आणि संस्थांना पगारी सुट्टी (holidays)जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मतदानाच्या एक दिवस आधी 10 नोव्हेंबर, मतदानाचा दिवस 11 नोव्हेंबर आणि मतमोजणीचा दिवस 14 नोव्हेंबर राहणार आहे. कर्मचाऱ्यांना मतदानात सहभागी होता यावे यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत त्रिपक्षीय लढत होणार आहे. भारत राष्ट्र समिती (बीआरएस), काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत. ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच या जागेचे निकाल जाहीर केले जातील. निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे आणि शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
ज्युबली हिल्ससोबतच पंजाबमध्ये एक दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरनतारनमध्ये मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी विधानसभा पोटनिवडणुका होत आहेत. परिणामी, तरनतारन जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद राहतील जेणेकरून मतदार कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करू शकतील. या दिवशी सर्व शाळा, सरकारी कार्यालये आणि खाजगी संस्था देखील बंद राहतील.

हेही वाचा :
कोरेगाव जमीन घोटाळा पार्थ पवारांचे मौन का?
उधळलेल्या बैलगाडीच्या धडकेत शर्यतप्रेमीचा मृत्यू, बोरगावच्या ‘श्रीनाथ केसरी’ला गालबोट
‘या’ राज्यातील बँक राहणार बंद…RBI न का दिली 11 नोव्हेंबरला बँकांना सुट्टी