कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
अगदी थंड डोक्याने, पद्धतशीर नियोजन करून मागे पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेऊन खुनासारखा खतरनाक गुन्हाएखाद्याने केला तर तो त्याला पचतोच असे नाही. गुन्हा करताना त्याच्याकडून घटनास्थळी अगदी किरकोळ प्रकारचा पुरावा राहतो आणि हा किरकोळ पुरावाच संबंधिताला गजाआड पोचवण्यास मदत करतो. काही प्रकरणात तर फिर्यादीचगुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्नी हरवली आहे अशी फिर्याद देण्यास आलेल्या एकाला पुणे पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून नुकतीच अटक केली आहे. शिक्षक (Tandoorkand)असलेली पत्नी अंजली जाधव हिचा नवरा समीर जाधव यांने ज्या पद्धतीने तिची हत्या केली आहे,ती पाहता माणसातला राक्षस कसा असू शकतो याचे प्रच्छन्न दर्शन घडले आहे. कुणाच्या अध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही, आपण भले आणि आपले काम भले असा साधेपणा चेहऱ्यावर दाखवणारा समीर जाधव प्रत्यक्षात मात्र साधेपणाचा मुखवटा धारण करणारा क्रूर गुन्हेगार आहे.

पत्नीची हत्या केल्याच्या आरोपावरून त्याला अटक केल्यानंतर त्याला ओळखणाऱ्या लोकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. आणि त्याने ज्या पद्धतीने आपल्या पत्नीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला ते पाहून समाजाला मोठा धक्का बसला. माणूस इतका क्रूर असू शकतो? या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर समीर जाधव यांने दिले आहे.समीर पंजाबराव जाधव (42) हा फॅब्रिकेशनचे काम करतो तर त्याची पत्नी अंजली ही शिक्षिका म्हणून काम करत होती. समीरला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येऊ लागला होता आणि म्हणूनच तिचा कायमचा काटा काढण्याचे विचार त्याच्या मनात घोळत होते.समीरने गोगलवाडी फाटा शिंदेवाडी भागात एक गोडाऊन दरमहा 18 हजार रुपये भाड्याने घेतले होते. फिरायला जाऊ म्हणून समीरने अंजलीला कार मधून नेले. दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तिला एका हॉटेलमध्ये नाश्ता दिला.
त्यानंतर तिला घेऊन तो गोडाऊन मध्ये आला. तिथे त्याने तिची गळा दाबून हत्या केली. मृतदेहाचे तुकडे केले आणि तयार करून ठेवलेल्या लोखंडी भट्टीमध्ये तिचे तुकडे टाकले आणि लाकडे व इंधन टाकून ते पेटवले. संपूर्ण मृतदेहाची राख झाल्यानंतर ती त्यांनी गोळा केली. नदीपात्रात विसर्जित केली. तयार केलेली लोखंडी भट्टी स्क्रॅप करून टाकली.आपली पत्नी अंजली हे दिनांक 28 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाली असल्याची फिर्याद त्यांने माळवाडी पोलीस ठाण्यात दिली होती.पण पोलिसांनी त्याच्याकडेच सखोलपणे चौकशी सुरू केल्यानंतर आणि प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर त्याच्या तोंडातून सत्य बाहेर पडले.पुणे ग्रामीण भागात घडलेल्या लोखंडी भट्टी कांडातून, नवी दिल्लीत घडलेल्या तंदूर खंडाची आठवण कोणालाही यावी.राष्ट्रीय काँग्रेसचा युवा नेता सुशील शर्मा यांने त्याची पत्नी नयना सहानी हिची अशाच पद्धतीने हत्या करून तिचा मृतदेह हॉटेलमधील एका तंदूर भट्टीमध्ये टाकून तो नष्ट केला होता.
1995 मध्ये नवी दिल्लीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. आरोपी सुशील शर्मा याचे वडीलही काँग्रेसचे मोठे पदाधिकारी होते. त्याला सुरुवातीला फाशीची शिक्षा झाली होती पण इसवी सन 2013 मध्ये फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली गेली होती. प्रकरणावर आधारित “तंदूर कांड” हा चित्रपट(Tandoorkand)मोठ्या पडद्यावर चांगलाच गाजला होता.पुण्यातील लोखंडी भट्टीकांडाची तुलना दृश्यम चित्रपटाची केली जाते. या चित्रपटात मृतदेह हा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाच्या टेबलाखालीपुरला गेल्याचे दाखवले आहे.त्यामुळे लोखंडी भट्टी कांडाशी त्याची तुलना उचित ठरत नाही.मुंबई परिसरात एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातील स्वयंपाक घरात खड्डा खोदून पुरण्यात आला. त्यावर फरशी बसवली. विशेष म्हणजे त्याच स्वयंपाक घरात ती आपल्या प्रियकराबरोबर राहत होती. आठच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि दोघांनाही अटक केली.
काही वर्षांपूर्वी कोल्हापुरातील एका उपनगरात दोघा भावांनी मिळून एका स्त्रीची हत्या केली आणि तिचा मृतदेह मोठ्या खड्ड्यात पुरला.मृतदेह कुजल्यानंतर त्याचा वास येऊ नये म्हणून दोन पोती मीठ खड्ड्यात टाकले होते आणि त्यानंतर त्यावर त्यांनी टॉयलेट बांधले होते.राजारामपुरी पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता तेव्हा कोल्हापूर हादरले होते.एकूणच कोणताही गंभीर गुन्हा सहसा पचत नाही. तो केव्हा ना केव्हा उघडकीस येतोच. समीर जाधव हा आपण केलेला गुन्हा कधीच उघडकीस येणार नाही अशा समजूतीत होता. पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यासाठी गेला आणि फसला.

हेही वाचा :
अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप
झापूक झुपूक सूरज चव्हाण ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात! लग्नाची तारीख आली समोर
इचलकरंजीतील तीन शाळकरी मुली बेपत्ता…