इचलकरंजीतील पंचगंगा घाटावर असलेल्या श्री रेणुका यलम्मा देवी मंदिरात(Temple) मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील देणगीपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरीला नेला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी मंदिराचे(Temple) कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि देणगीपेटीतील पैसे चोरून नेले. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सीसीटीव्ही सिस्टमचा डीव्हीआरही उचलून नेला, ज्यामुळे चोरटे ओळखणे कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मंदिर परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच आसपासच्या भागातील संशयास्पद हालचालींचा पोलिसांकडून आढावा घेतला जात आहे.
या घटनेमुळे पंचगंगा घाट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत, अशी मागणी भक्तांकडून होत आहे.

हेही वाचा :
11 आणि 14 नोव्हेंबरला शाळा आणि कॉलेजसह ऑफिसलाही असणार सुट्टी, काय आहे कारण?
कोरेगाव जमीन घोटाळा पार्थ पवारांचे मौन का?
उधळलेल्या बैलगाडीच्या धडकेत शर्यतप्रेमीचा मृत्यू, बोरगावच्या ‘श्रीनाथ केसरी’ला गालबोट