इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चिंताजनक घटना घडली आहे. शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता(missing) झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मुलींपैकी दोन १४ वर्षीय मुली एकाच शाळेत दहावीत शिक्षण घेत होत्या. शनिवारी सकाळी त्या शाळेला जातो, असे सांगून घराबाहेर पडल्या, मात्र त्या परतच घरी आल्या नाहीत. नातेवाईकांनी शाळेत चौकशी केली असता दोघी शाळेत आल्याच नसल्याचे उघड झाले. तत्काळ त्यांनी गावभाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तपासात या दोन्ही मुली शाळेच्या गणवेशात शहरातील एका मुख्य चौकातून एकत्र जाताना दिसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, शहरातील आणखी एका भागातून १६ वर्षीय मुलगीही बेपत्ता(missing) झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ती घराजवळील दुकानात जाते असे सांगून बाहेर पडली होती, मात्र तीही परतली नाही. सलग तीन अल्पवयीन मुलींचा मागोवा न लागल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पूनम माने आणि उपनिरीक्षक गोविंद कोळेकर यांच्या पथकांकडून मुलींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, तिन्ही मुलींबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने इचलकरंजी शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

 हृतिक – सुझान यांच्या लग्नाबद्दल मोठं सत्य समोर…

मोबाईल वापरणे होणार महाग! ‘या’ कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन वाढणार

हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *