महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय (Political)हालचालींना वेग आला आहे. अशा निर्णायक काळात स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा मुंडे यांनी मराठा आंदोलनातून राज्यभरात चर्चेत आलेल्या मनोज जरांगे पाटलांना दिलेली ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.करुणा मुंडे यांनी जरांगे पाटलांना “स्वराज्य शक्ती सेना” पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं निर्माण करण्याची शक्यता निर्माण केली आहे.

करुणा मुंडे यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेत आपल्या राजकीय प्रवासाविषयी खुलासे केले. “मी मोठ्या राजकीय घराण्याची सून आहे. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांच्या कुटुंबातून असूनही मला स्वतःचा पक्ष काढावा लागला. कारण न्याय मिळत नव्हता, महिलांना जेलमध्ये टाकले जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटलं, “मी ४५ वर्षांची स्त्री आहे, तरीही संघर्ष करावा लागतोय. काही जण लोकांच्या छाताडावर पाय देऊन मंत्री आणि आमदार झालेत. पण त्यांच्या पालकांनाही जेलमध्ये टाकलं जातंय. या सगळ्याच्या विरोधातच मी आवाज उठवला.”पत्रकार परिषदेत करुणा मुंडेंना विचारण्यात आले की, त्या मनोज जरांगेंची मदत मागणार का? त्यावर त्यांनी उत्तर दिले, “मी मनोज जरांगे पाटलांकडे निवेदन घेऊन गेले होते.
महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’चे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी माझी विनंती होती.”त्या पुढे म्हणाल्या, “जरांगे भाऊ आज तुम्हाला जनतेचा मोठा प्रतिसाद आहे. महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल, तर माझ्या पक्षाचे अध्यक्ष व्हा. मला कोणतेही पद किंवा तिकीट नको, फक्त जनतेला न्याय मिळावा हेच माझे उद्दिष्ट आहे.”
करुणा मुंडे यांच्या या ऑफरवर मनोज जरांगे(Political) पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारत सांगितले की, “मी एक समाजकारणी माणूस आहे. मी राजकारणात जाणार नाही. समाजासाठी लढणे हेच माझे ध्येय आहे.”या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कारण जरांगे यांच्या नावाभोवती प्रचंड जनसमर्थन असल्यामुळे, त्यांच्या प्रवेशाने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असती, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हेही वाचा :
खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर…
पंचगंगा घाटावरील श्री रेणुका यलम्मा देवी मंदिरात धाडसी चोरी देणगीपेटी आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास
11 आणि 14 नोव्हेंबरला शाळा आणि कॉलेजसह ऑफिसलाही असणार सुट्टी, काय आहे कारण?