खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत (health)मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांची प्रकृती खालावली आहे. याच कारणामुळे त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनामधून देखील विश्रांती घेतली आहे. संजय राऊत यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी राजकीय वर्तुळातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, संजय राऊतांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली आहे. त्यांना आता उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार झाले आहत. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरु असण्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती(health) आणखी बिघडली आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यानंतर आता संजय राऊत यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे समोर आले आहे, संजय राऊतांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी माहिती देत पुष्टी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज (दि.10) दुपारी डिस्चार्ज दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी त्यांचा सलाईन लावलेल्या हाताचा फोटो शेअर केला होता. यामध्ये हाताला सलाईन लावूनही खासदार संजय राऊत हे कागद पेन घेऊन लिखाण करत असल्याचे दिसून आले. खासदार राऊत म्हणाले की, हात लिहिता राहिला पाहिजे कसेल त्याची जमीन. लिहील त्याचे वृत्तपत्र. हा आमच्या पिढीचा मंत्र होता, अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, खासदार संजय राऊत प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम तसंच सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत. अशी पोस्ट त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी केली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी खासदार राऊत यांनी घेतलेला ब्रेक हा शिवसेना ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यानंतर खासदार राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती दिली होती. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना गर्दीत मिसळणं आणि बाहेर जाणं यावर निर्बंध असल्याचं म्हटलं होतं. पण मी लवकर बरा होऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते, चाहत्यांनीही त्यांना लवकर बरे व्हा, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा :

पंचगंगा घाटावरील श्री रेणुका यलम्मा देवी मंदिरात धाडसी चोरी देणगीपेटी आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास

11 आणि 14 नोव्हेंबरला शाळा आणि कॉलेजसह ऑफिसलाही असणार सुट्टी, काय आहे कारण?

कोरेगाव जमीन घोटाळा पार्थ पवारांचे मौन का?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *