दिवाळी आणि सणासुदीच्या काळात सोन्याच्या बाजारात नेहमीच उत्साह असतो. पण ऑक्टोबर महिन्यात सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर त्याच्या किमतींमध्ये (prices)घट दिसली. त्यामुळे आता सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि ग्राहक या विचारात आहेत की पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार. अलीकडच्या काळात जागतिक बाजारातील आर्थिक स्थिती, डॉलर इंडेक्स आणि व्याजदरवाढीचा प्रभाव सोन्यावर स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली रणनीती ठरवताना सावध राहणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, पुढील वर्षभरात सोन्याचे दर पुन्हा एकदा तेजी पकडू शकतात. सध्या सोन्याचा भाव थोडा स्थिर झाला असला तरी दीर्घकालीन दृष्टीकोनातून तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.तज्ज्ञांचा अंदाज आहे की 2026 पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹1,05,000 ते ₹1,10,000 या दरम्यान पोहोचू शकतो. तर 22 कॅरेट सोने ₹1,00,000 च्या आसपास राहू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यास आणि डॉलर कमकुवत झाल्यास सोन्याचा भाव आणखी वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
याशिवाय, काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे की जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार(prices) पुन्हा एकदा “सेफ हेवन” म्हणजेच सोन्याकडे वळतील. त्यामुळे दीर्घकाळासाठी सोने हे स्थिर गुंतवणुकीचे साधन राहीलतज्ज्ञांच्या मते, पुढील सहा महिन्यांत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात चढउतार न होता स्थिर राहतील. म्हणजेच सध्या ज्या दरात सोने आहे, त्याच आसपास किंमत राहण्याची शक्यता जास्त आहे.
एमसीएक्सवरील दर सध्या प्रति 10 ग्रॅम ₹60,000 च्या आसपास आहेत आणि यात कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ योग्य ठरू शकतो. पण अल्पकालीन नफ्याच्या अपेक्षेने खरेदी करणाऱ्यांनी सावध राहावे, कारण पुढील काही महिन्यांत बाजार फारसा बदलणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.सोन्याच्या दागिन्यांपेक्षा सध्या गुंतवणुकीसाठी “सॉव्हरीन गोल्ड बाँड”, “ETF” आणि “डिजिटल गोल्ड” यासारखे पर्याय अधिक सुरक्षित आणि फायद्याचे ठरू शकतात, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

हेही वाचा :
खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर…
पंचगंगा घाटावरील श्री रेणुका यलम्मा देवी मंदिरात धाडसी चोरी देणगीपेटी आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास
11 आणि 14 नोव्हेंबरला शाळा आणि कॉलेजसह ऑफिसलाही असणार सुट्टी, काय आहे कारण?