दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे दोन पुरुषांसोबत प्रेमसंबंध(lovers) होते. काही काळानंतर त्या महिलेच्या आयुष्यात एका दुसऱ्याच तरुणाची एन्ट्री झाली आणि याच संतापाच्या भरात दोन्ही प्रियकरांनी हत्येचा कट रचला. हा प्रकरण दिल्लीच्या नोएडा येथील असल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.या प्रकरणातील महिला ही मूळची जहांगीरपूरची रहिवासी आहे. तिचा नवरा त्यांच्या मुलासोबत हरियाणामध्ये राहत होता. महिला एकटीच राहून आपल्या गावातील घर सांभाळत होती. त्या महिलेची आधीच राकेश आणि बंटी नावाच्या तरुणांशी मैत्री होती. तिघांचेही कुटुंब एकमेकांच्या शेजारी असल्याचे होते. त्यामुळे दोघांचे महिलेच्या घरी सतत येणं-जाण असायचं.

चार ते पाच वर्षांपूर्वी, राकेशची पत्नी त्याला सोडून गेली. तर सहा महिन्यांपूर्वी बंटीचा तिच्या पत्नीशी सतत वाद होत होता. त्याची पत्नीसुद्धा त्याला सोडून दिल्लीला गेली. पत्नी सोडून गेल्यानंतर, दोन्ही तरुण या महिलेच्या जवळ गेले. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र अचानक तिघांच्याही आयुष्यात वेगळं वळण आलं. महिलेच्या संपर्कात एक भलताच तरुण आला आणि प्रेमसंबंधात गोंधळ उडाला. प्रेमसंबंधात(lovers) तिसऱ्याच्या एन्ट्रीमुळे बंटी आणि राकेश खूप अस्वस्थ झाले आणि त्यांना महिलेवर संशय येऊ लागला.या संशयातून बंटी आणि राकेशने मिळून महिलेला संपवण्याचा कट रचला. त्यांच्या प्लॅनिंगनुसार, ते १८ नोव्हेंबरच्या रात्री तिच्या घरी गेले. तिथे दोघांनीही महिलेचा स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर, कोणालाही त्यांच्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी तिचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या घरात टाकला.

गुरुवारी जुन्या मोडकळीस आलेल्या घरात महिलेचा मृतदेह आढळल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत शुक्रवारी बंटी आणि राकेश या दोन संशयितांना अटक केली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहे.

हेही वाचा :

“बाबा वेंगांनी सांगितलंय: 2026 हे वर्ष बदलणार तुमची दुनिया!”

EPFO मध्ये मोठा बदल होणार, 1 कोटी नोकरदारांना होणार फायदाचं फायदा

७ तारखेपर्यंत पगार न दिल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *