देशभरातील लाखो नोकरदारांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य सदस्यत्वासाठी असलेली पगार मर्यादा वाढवण्याची तयारी सुरू असून यात मोठा बदल अपेक्षित आहे. वित्तीय सेवा सचिव एम. नागराज यांनी संकेत दिल्यानुसार, ही मर्यादा ₹15,000 वरून थेट ₹25,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे EPF आणि EPS या दोन्ही योजनांमध्ये सामील लोकसंख्येत मोठी वाढ होणार असून जवळपास 1 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळू शकणार (benefit)आहे.

सध्या EPFO मध्ये सामील होण्यासाठी पात्रतेची पगार (benefit)मर्यादा ₹15,000 आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे आणि बदललेल्या वेतन संरचनेसह ही मर्यादा कालबाह्य झाल्याचं सरकारचं मत आहे. त्यामुळे आता ही मर्यादा ₹25,000 करण्याचा गंभीर विचार सुरू आहे. जर ही मर्यादा वाढली, तर सध्या कव्हरच्या बाहेर असलेले अनेक कर्मचारी EPF आणि EPS अंतर्गत येतील. तसेच ज्यांचे वेतन ₹15,000 ते ₹25,000 दरम्यान आहे त्यांना याचा थेट फायदा होणार आहे. याशिवाय सामाजिक सुरक्षा आणि निवृत्ती निधीमध्ये देखील मोठी वाढ होईल.

EPFO अंतर्गत सामील झाल्यावर कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 12% रक्कम EPF मध्ये जमा करतात आणि नियोक्ता देखील समान रक्कम जमा करतो. वेतन मर्यादा वाढवल्याने:

– मासिक योगदान वाढेल
– PF शिल्लक अधिक वेगाने वाढेल
– EPS अंतर्गत पेन्शन कव्हर अधिक मजबूत होईल
– या वाढलेल्या योगदानामुळे निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी बचत तयार होईल.

हेही वाचा :

७ तारखेपर्यंत पगार न दिल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते

उगवली शुक्राची चांदणी…! ‘दे धक्का’मधली सायली कुठे आहे? आता कशी दिसते बघा

भरधाव वेगात बाईक पळवली, मग हवेत उचलली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *