उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय ३०) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे २२ तारखेला घडलेल्या अपघातात कुसुमसह त्यांच्या पती विष्णु दामोदर सुदे (३५) आणि दोन लहान मुली रागिणी (९) व अक्षरा (६) गंभीर जखमी झाले होते. अपघात (Accident)इतका भीषण होता की दुचाकी संपूर्ण उद्ध्वस्त झाली आणि कुटुंबीय रस्त्यावर फेकले गेले.

जखमींना तातडीने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु गंभीर स्थितीमुळे त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. कुसुम सुदे यांची प्रकृती अत्यंत(Accident) नाजूक होती आणि डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान त्यांचे प्राण गेल्या. या हृदयद्रावक घटनेमुळे सुदे कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
दोन लहान मुलींसह संपूर्ण कुटुंबावर आलेल्या या संकटाने स्थानिक नागरिकांमध्ये ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जखमी विष्णु सुदे आणि दोन्ही मुलींवर अद्याप उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
‘त्याच्या जाण्याने…’, रात्रभर वीरूच्या आठवणीत जय अस्वस्थ! 2.25 AM ला अमिताभ म्हणाले
स्मृती मानधनाने घेतली वडिलांची भेट…
इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात