आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला चांगला, परफॉर्मन्स देणारा आणि(budget) बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन हवा असतो. विशेषतः १५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये अनेक कंपन्या उत्तम फीचर्ससह फोन उपलब्ध करून देत आहेत. या श्रेणीत सॅमसंग, रिअलमी आणि विवो या कंपन्यांचे 5G फोन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत. या तिन्ही फोनची किंमत बजेटमध्ये येत असून फीचर्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. जर तुम्ही कमी खर्चात चांगल्या कॅमेरासह, दमदार बॅटरी बॅकअप आणि जलद प्रोसेसर असणारा स्मार्टफोन शोधत असाल, तर ही यादी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. 5G सपोर्ट, मोठा डिस्प्ले, उच्च रिफ्रेश रेट आणि शक्तिशाली बॅटरी हे या तीनही स्मार्टफोन्सचे मुख्य आकर्षण आहे.

या यादीतील पहिला आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणजे (budget)Realme P3x, ज्याची किंमत फक्त ₹11,499 आहे. 5G सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 6.72 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि व्हिडिओ अनुभव अधिक स्मूथ मिळतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर असून दैनंदिन वापरापासून गेमिंगपर्यंत चांगली परफॉर्मन्स क्षमता आहे. याशिवाय, फोनमध्ये 6000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ वापरासाठी उत्तम बॅकअप देते. बजेट आणि बॅटरी हे प्राधान्य असेल तर हा फोन नक्कीच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

दुसऱ्या क्रमांकावर आहे Vivo Y31, ज्याची किंमत ₹14,999 आहे.(budget) हा Vivo च्या लोकप्रिय Y सिरीजमधील फोन असून मोठा 6.68 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 1000 nits पीक ब्राइटनेस असल्यामुळे तेज उन्हातही स्क्रीन सहज दिसते.कॅमेराच्या दृष्टीने या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 6500 mAh ची बॅटरी असून दीर्घकाळ वापरासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते. जर तुमचे बजेट १५ हजारांच्या आसपास असेल आणि तुम्हाला चांगल्या कॅमेरासह टिकाऊ बॅटरी हवी असेल, तर हा फोन निश्चितच योग्य पर्याय आहे.

तिसऱ्या क्रमांकावर आहे Samsung Galaxy M36, ज्याची किंमत (budget)फक्त ₹12,500 च्या आसपास आहे. सॅमसंगचा 5G सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन या बजेटमध्ये उत्कृष्ट फीचर्स देतो. फोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असून तो उत्तम व्हिज्युअल अनुभव देतो. या डिव्हाइसमध्ये Exynos चिपसेट वापरण्यात आला आहे, जो दैनंदिन कामे सहज हाताळतो. तसेच 5000 mAh बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. सॅमसंग ब्रँडची विश्वासार्हता, 5G सपोर्ट आणि AMOLED डिस्प्ले हवे असतील तर हा फोन नेमका तुमच्यासाठीच आहे.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद

EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा

उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *