ऑस्ट्रेलिया सरकारने सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांच्या(government)संरक्षणासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या देशाने १६ वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक, इंस्टावर बंदी आणली आहे. या पार्श्वभूमीवर आता टेक जायंट Metaने देखील १६ वर्षांखालील सर्व युर्जर्सना इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून काढून टाकण्यास सुरुवात केली. ही कारवाई ऑस्ट्रेलियाच्या नवीन सोशल मीडिया धोरणाअंतर्गत केली जात आहे, जी १० डिसेंबरपासून लागू होणार आहे.

कंपनीने अलिकडेच केलेल्या मोठ्या प्रमाणात वय पडताळणीत १६ वर्षांखालील युजर्सचे सुमारे (government)पाच लाख अकाउंट आढळले. या अकाउंटना आता लॉकआउट नोटीस पाठवण्यात आली आहे आणि १० डिसेंबरपर्यंत ते प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे काढून टाकले जातील. तर Messenger अॅप या बंदीमध्ये समाविष्ट नाही असे मेटाने स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारच्या या निर्णयानंतर मेटाने १६ वर्षांखालील युजर्सना शक्य तितक्या लवकर पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि खासगी संदेशांसह त्यांचा डेटा डाउनलोड करण्याचा सल्ला दिला आहे. (government)मेटाने म्हटले आहे की, “लवकरच तुम्ही फेसबुक वापरू शकणार नाही आणि तुमचे प्रोफाइल तुम्हाला किंवा इतरांना दिसणार नाही.” याचबरोबर कंपनीने या युजर्सना त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करण्यासही सांगितले जेणेकरून ते १६ वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

Meta ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय संचालक विल ईस्टन म्हणाले की,(government) हे पाऊल आव्हानात्मक आहे. मात्र परंतु कंपनीचे ध्येय तरुणांना सुरक्षित ऑनलाइन अनुभव प्रदान करणे आहे. आम्ही सरकारच्या ध्येयाशी सहमत आहोत, जरी संपूर्ण बंदी आपल्यासोबत काही आव्हाने घेऊन येत असली, तरीही, आम्ही सुरक्षित आणि संतुलित डिजिटल वातावरणाच्या समर्थनार्थ काम करत राहू.”
हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद
EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा
उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील