महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने आज शहरातील विविध (conduct)भागातील १८९ फलक अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केले. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून उद्घाटनाचे विविध फलक व वार्ताफलकही बंद करण्यात येत आहेत.

सोमवारी सायंकाळी आचारसंहिता सुरू झाल्याने रात्रीपर्यंत शक्य तितके फलक अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढले होते. आज सकाळपासून पुन्हा कारवाई सुरू केली. प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी बेकायदेशीर फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार महापालिकेने कारवाई केली. चार विभागीय कार्यालये, (conduct)अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत १८९ फलक कारवाई करत जप्त करण्यात आले. त्यात केएमटी बसस्टॉपवरील, रस्त्यावरील फलकांचा समावेश होता.
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?