मोबाईल वापरणाऱ्यांना नव्या वर्षात आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे.(expensive) कारण, २०२६ मध्ये मोबाईल रिचार्ज वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, एप्रिलमध्ये मोबाईल रिचार्जमध्ये २० टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सने १५ डिसेंबर रोजी मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्ट्सचा दाखला देत वाढीचा अंदाज वर्तवला आहे. एप्रिल ते जून २०२६ दरम्यान प्रीपेड आणि पोस्टपेड ४G आणि ५G प्लॅनच्या किमती १६ ते २० टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच, २०० रूपयांचा रिचार्ज पुढील वर्षी २३० ते २४० रूपयांपर्यंत जाऊ शकतो. अनेक कंपन्यांनी पुढील वर्षी १५ टक्क्यांपर्यंत रिचार्ज वाढतील असा अंदाज वर्तवला होता. पण त्यापेक्षा जास्त वाढ होऊ शकते, असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने आपल्या रिपोर्ट्समध्ये वर्तवलाय.

पुढील काही दिवसांत स्वस्त रिचार्ज अथवा प्लॅन बंद करण्यात येतील. (expensive) तर प्रिमियम रिचार्ज सुरू केले जातील. त्यामध्ये ओटीटीटी स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे. कारण, कंपन्या ग्राहकांना हळूहळू दरवाढीसाठी तयार करत आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्रीपेड अन् पोस्टपेडचे रिचार्ज वाढण्याची शक्यता आहे. देशातील लाखो मोबाईल युजर्सला हा मोठा हादरला मानला जातोय.मोबाईल रिचार्जमध्ये दरवाढ होण्याचा अंदाज खरा ठरला तर ही आठ वर्षांतील चौथी मोठी वाढ असेल. याआधी २०१९ मध्ये ३० टक्के, २०२१ मध्ये २० टक्के अन् २०२४ मध्ये १५ टक्क्यांनी रिचार्जचे दर वाढले होते. रिचार्जचे दर वाढले तर प्रस्थापित असलेल्या मजबूत कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल. दुय्यम कंपन्यांना ते आणखी मागे टाकतील, असा अंदाज मॉर्गन स्टॅनली यांनी व्यक्त केलाय.

एअरटेल आणि जिओ या आघाडीच्या दोन्ही कंपन्यांना दरवाढीसाठी अनुकूल आहेत.(expensive) ५जी नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आधीच अस्तित्वात आहे आणि एकेकाळी भांडवली खर्च हा महसूलाच्या जवळपास ३० टक्के होता. पण आता तो २० टक्क्यांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे. भविष्यात युजर्सला चांगले नेटवर्क मिळेल, पण त्यासोबत महागड्या रिचार्जची डोकेदुखीही येणार आहे. भविष्यात एअरटेलच्या युजर्समध्ये मोठी वाढ होऊ शकते,असाही अंदाज वर्तवलाय. तर व्होडाफोन आयडिया या कंपनीला वाईल्ड कार्ड म्हणून अवहाल म्हटलेय.

हेही वाचा :

कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार

सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *