थकीत पगाराच्या कारणावरून इचलकरंजीत मध्यरात्री झोपलेल्या पे-पार्किंग चालकावर(unpaid)कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गजानन बापू मुदगल (वय ४५, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (ता. १) मध्यरात्री इचलकरंजी एसटी बसस्थानक परिसरात घडली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मुदगल गेल्या पंधरा वर्षांपासून एसटी बसस्थानकात दुचाकी पार्किंगचा व्यवसाय करत होते. पार्किंगचे काम पाहण्यासाठी त्यांनी एका अल्पवयीन मुलाला आठ हजार रुपये मासिक पगारावर कामावर ठेवले होते. मात्र, संबंधित मुलाने आठ डिसेंबरपासून काम सोडले होते. त्यानंतर पगाराबाबत मागणी केल्यानंतर १५ जानेवारीला पैसे देण्याचे आश्वासन मुदगल यांनी दिले होते.

गुरुवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास प्रवाशांची वर्दळ कमी (unpaid)झाल्याने मुदगल हे पार्किंग परिसरात झोपले होते. मध्यरात्री सुमारे एक वाजता ते गाढ झोपेत असताना धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यात आले. झोपेतून दचकून उठल्यानंतर काम सोडलेला अल्पवयीन मुलगा हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हल्लेखोराने त्यांच्या तोंडावरही वार करून घटनास्थळावरून पळ काढला.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाही जखमी मुदगल कसाबसा बसस्थानकाच्या गेटपर्यंत आले आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांना तातडीने रिक्षातून आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या (unpaid)पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. रात्रभर शहरात शोधमोहीम राबविल्यानंतर जवाहरनगर परिसरात दोन अल्पवयीन संशयित मिळून आले. चौकशीत त्यांनी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कुणालाच कळणार नाही, असा हल्लेखोरांचा समज होता. हल्ल्यानंतर त्यांनी कोयता निर्जन ठिकाणी टाकून पलायन केले होते. मात्र, जखमी मुदगल यांनी दिलेल्या अचूक माहितीनुसार पोलिसांनी काही तासांतच दोघांना पकडण्यात यश मिळवले असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *