इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज (quiet) सायंकाळी झाली. शेवटच्या दिवशी सर्वच प्रभागांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पदयात्रा काढल्या. तर काही ठिकाणी महिला मेळावे व काॅर्नर सभा घेतल्या.यामुळे दिवसभर शहरात प्रचाराचा धुरळा उडाला. आता जाहीर प्रचाराच्या तोफा थांबल्या असल्या तरी छुप्या जोडण्या आणि प्रचाराला जोरदार वेग आला आहे. एकूण १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी तब्बल ३०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.गुरुवारी ता. १५ या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतदानाच्या ४८ तास आगोदर म्हणजे मंगळवारी सांयकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती झाली. तत्पूर्वी सकाळपासूनच सर्वच प्रभागांत उमेदवारांनी आपापल्या प्रभागात भव्य पदयात्रांचे आयोजन केले होते.वाजतगाजत व फटाक्यांची आतषबाजी करीत पदयात्रा निघाल्या. या पदयात्रांमधून उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काही ठिकाणी वेळ कमी मिळाल्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धावपळ करीत पदयात्रा पूर्ण केली.

भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी मंत्री पंकजा मुंडे राणाप्रताप चौकात आल्या होत्या. (quiet)तर शिव-शाहू आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रामहरी रुपणवार यांची लिंबू चौकात सभा झाली. दिवसभरात काही प्रभागांत राजकीय घडामोडी झाल्या.उमेदवारांनी प्रभागातील प्रभावी व्यक्तींच्या दिवसभर भेटीगाठी घेतल्या. छुप्या प्रचाराला वेग आला असून, मतदान फिक्स करण्यासाठी जोडण्या लावण्यास सुरुवात झाली होती. प्रचारात कोणी बाजी मारली, कोण निवडणूक येणार, कोणाचा पराभूत होणार, याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.काही दिवस नेत्यांच्या सभा, काॅर्नर सभा, प्रचार यात्रा यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. काही ठिकाणी राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. यातून एका ठिकाणी तोडफोडीची घटना घडली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.
प्रचार संपल्यानंतर मात्र शहराने शांततेचा श्वास घेतला.(quiet) शहरात प्रत्येक गल्ली-बोळात उमेदवारांच्या रिक्षा प्रचार करीत फिरत होत्या. एक रिक्षा गेली की दुसरी रिक्षा येत होती. प्रचाराचा आवाज सतत घुमत होता.सांयकाळी प्रचाराच्या रिक्षा थांबल्या. त्या पुन्हा प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाल्या; पण मोबाईलची खणखण सुरूच होती.महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच १६ जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत कोणाची सत्ता येणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आतापासूनच निकालाची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन