बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आली आहे. क्रिती सेननने तिच्या आई गीता सेननसोबत मुंबईच्या पॉश पाली हिल भागात समुद्राला तोंड असलेले एक डुप्लेक्स पेंटहाउस (house)खरेदी केले आहे, ज्याची किंमत तब्बल ७८.२० कोटी रुपये आहे.ही आलिशान मालमत्ता डेव्हलपर सुप्रीम वेंचर्स एलएलपीकडून खरेदी करण्यात आली आहे. ६,६३६ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या घरात सहा पार्किंगची जागा आणि १,२०९ स्क्वेअर फूटची टेरेस देखील आहे.

क्रिती सेननचे हे डुप्लेक्स १४ व्या आणि १५ व्या मजल्यावर आहे आणि त्याचे एकूण RERA कार्पेट क्षेत्र ५,३८७ स्क्वेअर फूट आहे. याशिवाय यात १,२५० स्क्वेअर फूटची मोकळी बाल्कनी आहे.मिळालेल्या वृत्तानुसार, हे घर सुप्रीम युनिव्हर्सलने तयार केलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत आहे. या घराची अधिकृत नोंदणी ३.९१ कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्यूटीसह झाली. जॅपकीच्या मते, हे २०२५ सालातील मुंबईतील सर्वात महागड्या प्रॉपर्टी डीलपैकी एक आहे. एक महिला खरेदीदार असल्यामुळे क्रिती सेननला महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार स्टॅम्प ड्यूटीमध्ये १% सूट मिळाली. सामान्यतः ५% स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते, पण तिने फक्त ४% म्हणजे ३.९१ कोटी रुपये भरले.

यापूर्वी, क्रिती सेननने २०२३ मध्ये अलिबागमध्ये २००० स्क्वेअर फूटचा प्लॉट (house)खरेदी केला होता. या भागात अनेक सेलिब्रिटींची घरे आणि प्लॉट आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनीही इथे एक प्लॉट घेतला होता. २०२४ मध्ये क्रिती सेननने बांद्रा वेस्टमध्ये एक ४-बीएचके अपार्टमेंटही खरेदी केले होते.
कंगना राणौतने उरकलंय गुपचूप लग्न? लिव्हइन रिलेशनशिपबद्दल केले मोठे व्यक्तव्य, म्हणाल्या…कामाबद्दल बोलायचे झाल्यास, क्रिती सेनन लवकरच धनुषसोबत आनंद एल राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त, ती शाहिद कपूर आणि रश्मिका मंदानासोबत ‘कॉकटेल २’ मध्ये देखील भूमिका साकारणार आहे. क्रिती सेननला एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत, तसेच २०१९ च्या फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी १०० यादीतही तिचा समावेश होता.
हेही वाचा :
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
आजचा गोपाळकालाच्या दिवशी राशींसाठी भाग्यशाली! भगवान श्रीकृष्ण करतील रक्षण, आजचे राशीभविष्य वाचा
जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद