पेट्रोल-डिझेल सोडा…आता सरकार आणखी एक झटका देण्याच्या तयारीत

मध्य पूर्वेतील तणाव कमी घेण्याचे नाव घेत नसतानाच कच्चे तेलाचे दर गगनाला भिडले आहेत.(government) त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा वाढवण्यात आले आहेत आणि आणखीन त्यात वाढ करण्याचा विचार केला जात आहे.परंतू आता सरकार आणखी एक मोठा झटका देण्याची तयारी करत आहे.त्यामुळे सामान्यांचे जगण आणखीनच कठीण होणार आहे.गेल्या काही काळापासून भारतीय रुपयात घसरण सुरुच आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार रुपया एक वर्षांतच १० ते १२ टक्के घसरला आहे. काही तज्ज्ञांनी तर रुपया १०० ची लेव्हल पार करण्याचा अंदाज वर्तवला आहे. या दरम्यान, रुपयांची वाढती घसरण रोखण्यासाठी आरपीआय मोठे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे.

ब्‍लूमबर्गच्या बातमीनुसार रुपयात स्थिरता आणण्यासाठी आरबीआय(government) रेपो रेट वाढवण्याच्या विचार करत आहे. तसेच करन्सी ट्रान्सफर आणि डॉलर जमा करण्याच्या योजनेवर देखील काम केले जात आहे. अशात जर रेपो रेटमध्ये वाढ केली तर या संकटाच्या काळात बँकेकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तींच्या ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे मध्यम वर्गाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.बुधवारी रुपयाच्या नव्या रेकॉर्ड लोने देशातील लोकांना चिंतेत ढकलले आहे.यामुळे आरबीआयचे अधिकारी देखील तणावात आले आहेत. बातमीनुसार डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९७ च्या आसपास पोहचल्याने आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा सह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी अंतर्गत बैठक बोलावली आहे.

बातमीनुसार सध्या उपलब्ध पर्यायांत व्याज दरात वृद्धी करणे हा एक उपाय आहे, (government) आरबीआयच्या मॉनिटर पॉलिसीची पुढची बैठक ५ जून रोजी होणार आहे. ज्यात रेपो रेट मध्ये वाढ करण्यावर विचार केला जाऊ शकतो. अन्य उपायांत एनआरआय डिपॉझिट स्कीमच्या माध्यमातून परदेशातून डॉलर जमा करणे आणि सॉवरेन डॉलर बॉन्ड विकणे यांचा समावेश आहे.विचाराधीन असलेले उपाय २०१३ च्या टेपर टँट्रम काळाच्या दरम्यान घेतलेल्या काही उपायांशी मिळते जुळते आहे. त्यावेळी भारताने परकीय चलनाचा प्रवाह वाढवण्यासाठी स्थानिक बँकांच्या माध्यमातून NRI लोकांसाठी डिपॉझिट स्कीम सुरु केली होती. आरबीआयच्या अंदाजानुसार या वेळी या योजनांतून ५० अब्ज डॉलरपर्यंतची रक्कम उभी केली जाऊ शकते. आधी ही रक्कम सुमारे ३० अब्ज डॉलर होती.आरबीआयची सहा सदस्यी मुद्रा निती समितीची बैठक ३ ते ५ जून दरम्यान होणार आहे. समितीने या वर्षी आपल्या मानक दराला ५.२५ टक्क्यांवर अनचेंज ठेवला आहे. मात्र, बहुतांशी अर्थतज्ज्ञांनी येणाऱ्या काही महिन्यात यात वाढ होण्याची भविष्यवानी केली आहे.

हेही वाचा

शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?

पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?

वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला