महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही तास (distribution)आधी गांधी कॅम्प परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपच्या दोन गटांतील समर्थकांत तुफान राडा झाला. जोरदार वाद उफाळून येत शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. एकमेकांना जमिनीवर पाडून मारहाण, शर्ट फाडण्यापर्यंत प्रकार घडला. या घटनेनंतर दोन्ही गटांनी हातात तलवारी, लाकडी बॅट घेऊन रस्त्यावर उतरल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.काल सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास गांधी कॅम्प येथे भाजपच्या एका माजी उपनगराध्यक्षांचे भाऊ आले होते. यावेळी ते प्रभागातील भाजप विरोधी उमेदवाराच्या समर्थनार्थ पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत प्रभागातील भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. या आरोपावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली.

क्षणातच वाद चिघळत दोन्ही गट आमने-सामने आले. कंबरेचा बेल्ट काढून एकमेकांवर धावून जाणे, (distribution) एका व्यक्तीला खाली पाडून बेदम मारहाण करणे, शर्ट फाटेपर्यंत झालेला गोंधळ यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.यानंतर संतप्त समर्थकांनी तलवार घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून गांधी कॅम्पमधील भाजप उमेदवाराच्या समर्थकांनीही तलवारी व इतर धारदार शस्त्रे शस्त्रे हातात घेतली. दोन्ही गट शस्त्रांसह समोरासमोर येताच परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही जागरूक नागरिकांनी मध्यस्थी करत जमावाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही गांधी कॅम्पमधील भाजप उमेदवाराचे समर्थक मोठ्या संख्येने हातात लाकडी बॅट्या व तलवारी घेऊन मुख्य रस्त्यावर उतरले. मुख्य मार्गावर जमाव जमल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची माहिती मिळताच गावभाग व शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी जोरदार बंदोबस्त लावत जमावाला पांगवले. काही काळासाठी (distribution)परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनल्याने राखीव दलाच्या पोलिस तुकडीलाही पाचारण करण्यात आले.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पोलिसांनी सांगितले.या गोंधळाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष आणि गांधी कॅम्प मधील भाजप उमेदवाराचे पती थेट आमने-सामने आले. गुलाल कसा लागतो, निवडून कसा येतो ते दाखवतो, अशी एकमेकांना बघून घेण्याची भाषा त्यांनी पोलिसांसमोरच केली. भाजपमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर येत वाद वाढल्याने दोन्ही प्रमुखांना पोलिसांनी बाजूला केले

हेही वाचा :

पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार

यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’

मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *