जांभळी ता. शिरोळ येथे जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील वय ४४, रा. माळभाग, (brutally)जांभळी यांचा आज निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोरांनी डोक्यात धारदार लोखंडी हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पाटील दुचाकीवरून जांभळी येथून जयसिंगपूरकडे येत होते. कुरडे मळ्याजवळ आल्यानंतर हल्लेखोर अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आडवे आले.

त्यांनी संदीप यांना घेरत डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले.(brutally) त्यानंतर हल्लेखोरांनी येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची मोटार रस्त्याच्या चरीत अडकली. हल्लेखोर तेथेच मोटार सोडून पसार झाले.हल्लेखोरांनी ही मोटार भाडे तत्त्‍वावर घेतल्याचे समजते. पोलिसांना मोटारीमध्ये कोयता, लोखंडी रॉड व मोबाईल मिळून आला आहे.

खून कोणत्या कारणातून झाला, हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.(brutally) जयसिंगपूर व शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खुनाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू केले होते. या खुनाची माहिती मिळताच संदीप पाटील यांचे नातेवाईक व मित्रांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला.

हेही वाचा :

पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा

अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर

खासदार ते सहा वेळा उपमुख्यमंत्री; अशी राहिली अजित पवारांची राजकीय कारकिर्द!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *