अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका शिक्षकाला (assault)आज २० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मुहमंदतल्हा मुस्तफा शेख वय २७, रा. मदिना मशिदीजवळ, यादवनगर असे त्याचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी ही शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता.

याबाबत अधिक माहिती अशी ः आरोपी मुहमंदतल्हा शेख(assault) याच्याकडे शिकण्यासाठी मुले येत होती. त्याने त्यापैकी एका मुलाला सायंकाळी थांबवले. इतर मुले गेल्यानंतर स्वतःच्या खोलीतच या मुलाशी लैंगिक चाळे केले. याबाबत घरी सांगितल्यास तुझे शिक्षण बंद करणार असे बजावले. मात्र, मुलाने घरी जाऊन पालकांना ही बाब सांगताच याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी सहायक निरीक्षक डी. टी. जौंजाळे यांनी तपास (assault)करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. सहायक सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद, तपासलेले साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्त कारावास, १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
हेही वाचा :
नोकरीची संधी, Income Tax Department साठी काम करा, लगेच अर्ज करा
UPI पेमेंट फेल? तरीही कमाई होणार, जाणून घ्या हा फायद्याचा नियम
लँडिंगवेळी नासाच्या विमानाला आग; वैमानिक थोडक्यात बचावले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल