कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

राजकारणात सत्तेला कमालीचे महत्त्व असतं. आणि सत्ताकारणात नात्यांचा उत्सव नसतो.(droves)सत्ता महत्त्वाची की नातेसंबंध असे एखाद्या किंवा कोणत्याही राजकारण्याला विचारलं तर तो नातेसंबंध दुय्यम स्थानावर ठेवेल. अशाच काहीशा अनुभवातून सध्या महाराष्ट्र जातो आहे. अजितदादा पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या पटांगणात ्या चौथर्‍यावर अग्निसंस्कार झाले त्या चौथर्‍यावरील जमीन अजून थंड सुद्धा झाली नसेल तोवर त्यांची रिक्त जागा भरून काढली आहे. हे इतक्या लवकर होईल असे राजकीय विश्लेषकांनाही वाटत नव्हतं. अशावेळी भा.रा. तांबे यांची “जन पळभर म्हणतील हाय! हाय! मी जाता राहील कार्य काय?”ही कविता हमखास आठवते.अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर दिनांक 29 जानेवारी रोजी अग्निसंस्कार झाले. आणि अगदी दुसऱ्याच दिवशी शासकीय दुःखवता असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे नेते मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. अजितदादांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांचे नावही या नेत्यांनी या भेटीत सुचवले. सुनेत्रा पवार किंवा पवार कुटुंबातील कोणालाही विश्वासात न घेता या नेत्यांनी परस्पर निर्णय घेतला. हिंदू धर्मात बारा किंवा तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते.

राज्य शासनाने तर दुखावटा जाहीर करून तीन दिवसांचे सुतक जाहीर केले होते. (droves)म्हणजे सुतक असताना असा राजकीय निर्णय घेण्याची इतकी घाई कशासाठी हा राज्यातील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. आणखी पंधरा दिवस राज्यांना उपमुख्यमंत्री मिळाला नसता तर आकाश कोसळणार होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि ती स्वाभाविक आहे.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन झाल्यानंतर बारामती मधून श्रीमती सुनेत्रा पवार, त्यांचे दोन्ही सुपुत्र हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले. शनिवारी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होऊन त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. सायंकाळी साधेपणाने राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची आता नोंद होईल.
शरद पवार यांच्याशी सल्लामसलत न करता, किंवा त्यांना बदलत्या राजकारणाची माहिती न देता सुनेत्रा पवार आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र हे बारामती मधून घाई गडबडीने मुंबईकडे रवाना झाले. पवार घराण्यात हे पहिल्यांदा घडले आहे.

अस्थि विसर्जन झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून (droves)सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबद्दल सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होणार हे गृहीत धरून”सुनेत्रा पवार यांनी पती निधनाचे दुःख मोठ्या धैर्याने बाजूला ठेवून मंत्रीपदाची शपथ घेतली”अशा आशयाच्या बातम्या मीडियातून विशेषता सोशल मीडियात काही जणांनी बातम्या पेरायला सुरुवात केली होती. असा राजकीय निर्णय घ्यायला धाडस लागते अशा प्रतिक्रिया सुद्धा जाणून-बुजून व्यक्त होतील अशी व्यवस्था करण्यात आली. एकूणच या राजकीय निर्णयाला सर्वसामान्य जनतेने इमोशनल टच देऊ नये यासाठी जाणून-बुजून काही गोष्टी करण्यात आल्या. पण तरीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ पंधरा दिवसानंतर सुद्धा घेता आली असती. मग घाई का केली याचे सर्वसामान्य जनतेला पटेल असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांने दिलेले नाही. अजित दादा पवार यांचे निधन आणि नंतर लगेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली. जयंत पाटील यांनी त्याबद्दल सांगितले.

शरद पवार यांनीही अजितदादांची जी इच्छा होती तीच इच्छा आमचीही आहे (droves)असे सांगून दोन्ही गटाचे विलीनीकरण
होण्यावर सहमती दर्शवली होती. आधी एकत्रीकरण झाले असते तर राजकीय निर्णय अधिकार ज्येष्ठत्वाच्या नात्याने शरद पवार यांच्याकडे गेले असते. आणि अजितदादा गटाच्या मनात जे आहे तेच शरद पवार यांच्याकडून होईल याची शाश्वती काय? अशी सावध भूमिका घेऊन अजितदादा गटाच्या नेत्यांनी जलद हालचाली केल्या. आणि आमच्या सर्वोच्च नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करून टाकली. एकत्रीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या हातामध्ये जाईल अशी सुद्धा या नेत्यांना भीती वाटली असावी. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय दृष्ट्या गरज आहे. शिंदे गट आणि अजितदादा गट या दोघांनाही राजकीय सोय म्हणून वापरता येईल अशी भूमिका भाजपची असू शकते.घाई गडबडीने राजकीय हालचाली करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता हे जरी खरे असले तरी दुःखट्याचे तेरा दिवस संपल्यानंतर हे करता आले असते. अशी सर्वसामान्य जनतेची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.
शेवटी काय भा.रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात तेच खरं आहे”जन पळभर म्हणतील हाय! हाय! मी जाता राहील कार्य काय!”

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *