अभिनेता राजपाल यादव याने आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.(dead)अभिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत राजपाल यादव याने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राद्य केलं. पण खाजगी आयुष्यात अभिनेत्याने अनेक चढ – उतार पाहिलेले आहेत. बॉलिवूडचा विनोदवीर अभिनेता… ही ओळख मिळवण्यासाठी अभिनेत्याला मोठा संघर्ष करावा लागला… राजपाल यादव हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कुलारा या छोट्याशा गावातील आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेला राजपाल सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहत होता, परंतु त्याच्या लहान उंचीमुळे त्याला हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. पण अभिनेत्याने माघार घेतली नाही.

1991 मध्ये राजपाल यादव याला पहिली नोकरी लागली. (dead)नोकरी लागल्यामुळे कुटुंबियांनी अभिनेत्याचं लग्न केलं… सर्वकाही सुरळीत सुरु असताना, अभिनेत्याच्या आयुष्यात मोठी घटना घडली… राजपाल यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाले. डिलिव्हरीच्या वेळी राजपाल याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं…लग्नाच्या काही महिन्यांनंतर, राजपाल याला पत्नीचा मृतदेह स्वतःच्या खांद्यावर उचलावा लागला… एका मुलाखतीत राजपाल म्हणालेला, ‘मी दुसऱ्या दिवशी तिला भेटायला जाणार होतो… पण मला तिचा मृतदेह भेटला,,, तेव्हा मी फक्त 20 वर्षांचा होतो आमि ते क्षणी मला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला होता…
अनेक संकटांचा सामना केल्यानंतर राजपाल याच्या आयुष्यात स्थिरता आली, (dead)जेव्हा अभिनेत्याने राधा यादव हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. राजपाल कायम सांगतो, राधाने मला फक्त संभाळलं नाही तर, माझ्या आणि माझ्या पहिल्या पत्नीच्या मुलीला देखील प्रचंड प्रेम दिलं. राजपाल म्हणतो, ‘मााझे गुरु, माझे आई – वडील यांच्यानंतर जर कोणी मला सर्वात जास्त संभाळलं आहे तर, माझ्या पत्नीने… राधाने’ सांगायचं झालं तर, राजपाल याची मुलगी आता लखनऊ येथे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे…राजपाल याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 2003 मध्ये कॅनेडियन रहिवासी राधा हिच्यासोबत लग्न केलं. या जोडप्याला हर्षिता आणि रेहांशी या दोन मुली आहेत. . राजपाल त्याच्या पत्नीपेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे. राजपाल आणि राधा यांच्या लग्नाला जवळजवळ 22 वर्ष झाली आहेत.
हेही वाचा :
T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट
Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…