कोल्हापुरात भोंदूगिरीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे.(lodge) भोंदू बाबाच्या जाळ्यामध्ये अडकून अनेक जण धनसंपत्ती गमवून बसतात. अशावेळी बऱ्याचदा महिला देखील सहजरित्या भोंदू बाबाच्या जाळ्यात येत असतात. अशीच एक घटना कोल्हापूर शहरात समोर आली आहे. बहिणीच्या कॅन्सर उपचारासाठी औषध देण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एका महिलेवर अत्याचार केले आहेत. घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.बहिणीच्या कॅन्सर उपचाराच्या आमिषाने पीडित विवाहित महिलेला लॉजमध्ये नेल्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी 16 फेब्रुवारी दुपारी घडलेल्या या घटनेची फिर्याद गुरुवारी 19 फेब्रुवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. संशयित प्रतीक मुळे पसार असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली असून, संशयिताला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

शहरातील लक्ष्मीपुरी येथील मटण मार्केटजवळील महादेव मंदिर(lodge) परिसरात प्रतीक मुळे उर्फ भोंदूबाबाचा सतत वावर असतो. तेथे देव-देवतांच्या फोटोंची पूजा करून तो स्वतःला ‘देवदेवसी’ करणारा बाबा म्हणवतो. दर गुरुवारी त्याच्या ‘दर्शनासाठी’ स्थानिक नागरिक गर्दी करतात. पीडित महिलेच्या बहिणीला कॅन्सर झाल्याने तिने मुळे याला ही बाब सांगितली. संबंधित महिलेचा पती दोन दिवस परगावी गेल्याची संधी या बाबाने साधली. घरगुती औषधाने उपचार करून देईन, असे आमिष मुळेने दाखवले. औषध देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेला सोमवारी दुपारी 3.30 वाजता शिवाजी पेठेत बोलावून तिला लाल रंगाच्या मोटारीत बसवले आणि कळंबा तलाव, गारगोटी रस्ता परिसरातील लॉजकडे नेले.
लॉजच्या खोलीत नेल्यानंतर मुळेने दरवाजा बंद करून घेतला.(lodge) प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. भेदरलेल्या महिलेनं दोन दिवस लपवून ठेवलेल्या या घटनेची माहिती पतीला परगावाहून परतल्यावर सांगितली. कुटुंबाने प्रथम करवीर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली, पण घटना जुना राजवाडा पोलिस हद्देतील असल्याने तेथे फिर्याद देण्यात आली. 33 वर्षीय पीडित महिलेची मुळे याच्याशी पूर्वीची ओळख असल्याने त्याने विश्वासाचा गैरफायदा घेतला. पीडितेचे कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत असून, ती धुण्या-भांड्याचे काम करून उदरनिर्वाह चालवते.
जुना राजवाडा पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या (lodge)नेतृत्वाखाली तपास सुरु असून, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. संशयित मुळे महादेव मंदिरशेजारील फ्लॅटमध्ये राहतो. लाल मोटार, मोबाईल लोकेशन आदी पुराव्यांचा मागोवा घेत पोलिस पथकं रात्रीपासूनच कार्यरत आहेत. लवकरच आरोपीला अटक होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात भोंदूबाबांच्या अफाट कृत्यांबाबत जनआक्रोश वाढला असून, अंधश्रद्धेविरोधी मोहिमांना वेग येईल, असे मत व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
जगभरात खळबळ! अमेरिकेला सर्वात मोठा झटका
PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा…