टीम इंडियाचा युवा चेहरा आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या क्रिकेटविश्वात मोठं नाव बनला आहे. (cricket) इंग्लंड दौऱ्यात गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली. मैदानावर दमदार परफॉर्मन्स देणारा गिल मैदानाबाहेरही तितकाच चर्चेत असतो. त्याची एकूण संपत्ती किती आहे, पगार किती मिळतो, कोणत्या लक्झरी कार्स त्याच्याकडे आहेत, हे जाणून घेऊया.25 वर्षीय शुभमन गिल याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्याने 37 कसोटी, 55 वनडे आणि 21 टी-20 सामने खेळले असून त्याच्या नावावर अनुक्रमे 2647, 2775 आणि 578 धावा आहेत. गिल तीनही फॉर्मेटमध्ये भारताचा महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे.

शुभमन गिल सध्या बीसीसीआयच्या ग्रेड A करार यादीत असून त्याला वार्षिक 5 कोटी रुपये पगार मिळतो. (cricket) याशिवाय प्रत्येक सामन्यापाठीमागे वेगवेगळं मानधन दिलं जातं – टेस्टसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख, आणि T20 साठी 3 लाख रुपये आयपीएलबद्दल बोलायचं झाल्यास, 2025 मध्ये गुजरात टायटन्सकडून त्याला तब्बल 16.5 कोटी रुपये मिळाले. 2018 ते 2021 दरम्यान केकेआरने त्याला दरवर्षी 1.8 कोटी दिले होते. 2022 ते 2024 दरम्यान त्याचा पगार 8 कोटी होता. गिल IPL मधूनच प्रचंड कमाई करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2025 पर्यंत शुभमन गिलची एकूण संपत्ती ₹32 ते ₹34 कोटींच्या घरात आहे.(cricket) ही संपत्ती मुख्यतः बीसीसीआयचा पगार, IPL आणि ब्रँड अॅडव्हर्टायझमेंट्समधून आलेली आहे. गिलचं मूळ गाव पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील जयमल सिंह हे आहे. तिथे त्याचं एक सुंदर आलिशान घर आहे. गिलकडे Range Rover SUV (90 लाख), Mercedes Benz E350 (90 लाख) आणि Mahindra Thar (15 लाख) अशी तीन लक्झरी कार्स आहेत. ही थार गिफ्ट स्वरूपात मिळाली होती.
हेही वाचा :