पर्यटनासाठी आलेल्या पाच तरुणांपैकी एका तरुणाचा दूधगंगा नदीत (engineering) बुडून मृत्यू झाल्याची घटना काळम्मावाडी येथे घडली. अभिषेक बाबासो कांबळे वय २१, रा. शिराळा, जि. सांगली असे या तरुणाचे नाव आहे.दरम्यान, अभिषेकच्या अकाली मृत्यून शिराळ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री उशिरा त्याच्यावर शिराळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील , बहीण ,आजी, दोन चुलते, चुलती असा परिवार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिराळा येथील अभिषेक कांबळे हा (engineering) कोल्हापूर जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो आपल्या चार मित्रांसह राधानगरी तालुक्यात पर्यटनासाठी आला होता. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हे सर्वजण काळम्मावाडी येथील दूधगंगा नदीच्या पात्रातील काळुकीच्या डोहात फेसाळणाऱ्या पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले होते.यावेळी अभिषेक कांबळे याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. याबाबत वडील बाबासो कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत राधानगरी पोलिसांत वर्दी दिली. काल बुधवारी सायंकाळी पोलिसांनी शोधमोहीम राबवली, मात्र मृतदेह सापडला नाही.
काल गुरुवारी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. राधानगरी पोलिस, (engineering)काळम्मावाडी धरण सुरक्षा रक्षक पथक यांच्या मदतीने सुमारे तासभर शोध घेतल्यानंतर अभिषेकचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान, काळम्मावाडी येथील या डोहात यापूर्वीही दहा पेक्षा अधिक अपघाती मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. धोक्याचे फलक लावूनही पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था ठेवून पर्यटकांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी