पॅन इंडिया स्टार रश्मिका मंदाना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव (shine) उजळवण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या अभिनयाबरोबरच साधेपणा आणि ग्लोबल लोकप्रियतेमुळे नेहमी चर्चेत असणारी रश्मिका यंदा 2026 मध्ये जपानमधील प्रतिष्ठित Global Anime Awards मध्ये प्रेझेंटर म्हणून झळकणार आहे. ही मोठी घोषणा स्वतः रश्मिकाने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

हा भव्य सोहळा 23 मे 2026 रोजी टोक्यो येथे (shine) पार पडणार असून, जगभरातील नामवंत कलाकार, क्रिएटर्स आणि एनीमे इंडस्ट्रीतील दिग्गज एकाच मंचावर दिसणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा यावेळी गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, रश्मिका मंदाना यासाठी नवीन नाही. याआधी 2024 सालीही ती या मंचावर झळकली होती आणि अशा प्रकारच्या प्रतिष्ठित एनीमे अवॉर्ड्समध्ये प्रेझेंटर होणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनत तिने इतिहास घडवला होता. तिच्या या यशामुळे भारतीय कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय दारे अधिक खुली झाली.
टोक्योमध्ये (shine) पहिल्यांदा गेल्याचा अनुभव रश्मिकासाठी खूप खास ठरला होता. जपानला भेट देणं हे तिचं बालपणापासूनचं स्वप्न होतं आणि एनीमे अवॉर्ड्समुळे ते पूर्ण झाल्याचं तिने सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा त्याच मंचावर तिची उपस्थिती पाहायला मिळणार असल्याने तिचे चाहते उत्सुक आहेत.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप