गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत होते. (unseasonal rains) पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता. मात्र आता या परिस्थितीत काहीसा दिलासा मिळत असून राज्यातील हवामान हळूहळू बदलताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होत असून उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे.

आज राज्यात (unseasonal rains) कुठलाही मोठा पावसाचा इशारा नसला तरी अंशतः ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होणार असून वातावरण मुख्यतः कोरडे आणि उष्ण राहील. सध्या तापमानात चढ-उतार सुरू असले तरी दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे.

विशेषतः मुंबई आणि कोकण पट्ट्यात हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. (unseasonal rains) अवकाळी पावसाचा धोका कमी झाला असला तरी दमट आणि उष्ण वातावरणामुळे त्रास वाढला आहे. कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत ते आणखी २ ते ३ अंशांनी वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर भारतात मात्र हवामानाचे वेगळे चित्र दिसत आहे. दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात जोरदार वारे आणि पावसामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा वेग वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर काही भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हिमालयीन राज्यांमध्येही (unseasonal rains) वातावरण अस्थिर असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.

तथापि, ही अस्थिर परिस्थिती फार काळ टिकणार नसून पुढील दोन दिवसांत उत्तर (unseasonal rains) भारतातही हवामान हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये आकाश निरभ्र होऊ लागले असून हवामानातील बदल आता हळूहळू इतर भागांकडे सरकत आहेत. गुरुवारपासून बहुतांश भागांत वातावरण स्वच्छ आणि स्थिर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *