विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत नवी माहिती; चाहत्यांनी केली प्रार्थना, (cricket)लहान भावाने दिली सविस्तर अपडेट भारतीय क्रिकेटचा माजी तडाखेबाज फलंदाज आणि सचिन तेंडुलकरचा बालपणीचा जिवलग मित्र विनोद कांबळी गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती समस्यांमुळे चर्चेत आहे. कधी मैदानावर दमदार चौकार-षटकारांनी चाहत्यांना वेडं करणारा हा फलंदाज आता आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या तब्येतीबाबतची ताजी माहिती त्याचा लहान भाऊ वीरेंद्र कांबळी याने दिली आहे.
कांबळीची प्रकृती का बिघडली? कांबळीची क्रिकेट कारकीर्द ऐन उंचीवर असतानाच चुकीच्या सवयींमुळे त्याचे आयुष्य विस्कळीत झाले. याचा परिणाम त्याच्या शारीरिक तसेच आर्थिक स्थितीवर झाला. मागील काही वर्षांपासून तो गंभीर आरोग्य समस्यांना सामोरा जात आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्याची प्रकृती अचानक खालावली. (cricket)सुरुवातीला यूरीन इन्फेक्शन असल्याचं समजलं. मात्र काही दिवसांनी परिस्थिती गंभीर झाली आणि डिसेंबरमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या (ब्लड क्लॉट्स) असल्याचं निदान केलं. त्यावर तातडीने शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले.

आर्थिक मदतीसाठी दिग्गज क्रिकेटपटू पुढे या काळात कांबळीची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. त्याला वैद्यकीय खर्चासाठी मदतीची गरज भासली. अशा वेळी त्याचे मित्र आणि माजी सहकारी, यामध्ये सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू पुढे सरसावले आणि त्याला आधार दिला. 3 डिसेंबर 2024 रोजी गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात कांबळी उपस्थित होता. मात्र त्यावेळी त्याची प्रकृती पाहून सर्वजण हळहळले.
वीरेंद्र कांबळीने दिली तब्येतीबाबतची अपडेट विनोद अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला बोलताना त्रास होतो, चालताना तोल जातो आणि जीभ अडखळते, असं वीरेंद्रने सांगितलं. तरीही परिस्थिती सुधारते आहे. (cricket)विनोदला फिजिओथेरपी आणि रिहॅब सुरु आहे. “त्याने 10 दिवसांचं रिहॅब पूर्ण केलं आहे. बॉडी चेकअपमध्ये धोकादायक काही नाही. मात्र पूर्णपणे ठीक होण्यासाठी वेळ लागेल,” असं तो म्हणाला.

चाहत्यांना भावनिक आवाहन वीरेंद्रने सर्व चाहत्यांना विनंती केली आहे – “विनोद हा चॅम्पियन आहे. तो आजारावर मात करेल. आज तो संघर्ष करतोय पण उद्या पुन्हा चालू, फिरू, धावू शकेल. कदाचित मैदानावरही दिसेल. त्यासाठी त्याला तुमच्या प्रार्थनेची, प्रेमाची आणि पाठिंब्याची नितांत गरज आहे.” सध्या कांबळी घरीच आहे, उपचार सुरु आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली हळूहळू सुधारणा होत आहे. चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी, असा सूर क्रिकेट विश्वात उमटला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय