सध्या देशभरात सणासुदीचं वातावरण आहे. भारतात सणाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याची पद्धत आहे. काही लोक कार, लॅपटॉप, फ्रिज सारख्या मोठ्या वस्तूंचीही खरेदी करतात. तुम्हीही जर काही मोठी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते.

भारतातली लोकप्रिय कार मारुती सुझुकी डिझायर घ्यायची जर तुमची इच्छा असेल तर आताचा योग सर्वात उत्तम ठरू शकतो. मारुती सुझुकी ही भारताची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. याच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार आहेत. मारुती सुझुकी डिझायर ही सेडान सेगमेंटची कार आपल्या देशात खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला मारुती सुझुकी डिझायर खरेदी करायची झाली तर त्याचे ईएमआय कॅलक्युलेशनविषयी माहिती असणे महत्वाचे आहे. आणि आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
GST कपातीनंतर काय आहे नवीन किंमत “
डिझायरची GST कपातीनंतर किंमत ₹87,700 ने कमी झाली आहे. त्यामुळे ₹625,600 ही नवीन किंमत झाली आहे. GST कपातीनंतर बऱ्याच वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. कारवर आधी 28 टक्के GST लागू होता, आता सरकारने तो 18 टक्क्यांवर आणला आहे. परिणामी बहुतेक कारच्या किमतीत घट झाला आहे.
तुम्ही जर दिल्लीमध्ये मारुती सुझुकी डिझायर घेणार असाल तर RTO साठी ₹52,000 आणि विम्यासाठी ₹37,000 द्यावे लागतील. बाकीचा खर्च जोडून कारची एकूण किंमत ₹7.16 लाख होते.
मंथली EMI :
जर तुम्ही ₹2 लाख एवढी डाउन पेमेंट केली तर ₹5.16 लाखांचे लोन तुम्हाला बँकेकडून घ्यावे लागेल. जर लोन 3 वर्षांसाठी 9 टक्क्यांच्या व्याजदरावर मिळत असेल तर तुम्हाला ₹16,409 एवढा ईएमआय द्यावा लागेल.

3 वर्ष दर महिन्याला 16,409 रुपयांचा ईएमआय भरून, बँकेला तुम्ही एकूण 5.90 लाख रुपये द्यावे लागतील. यात फक्त 75,712 रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. म्हणजेच ईएमआयच्या प्रक्रियेतून मारुती सुझुकी डिझायर खरेदी केल्यास तुमचा 75,712 रुपयांचा खर्च होणार आहे. जर ईएमआयचा कालावधी तुम्ही वाढवला तर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागू शकते.
हेही वाचा :
मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर?
मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ