मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा (murder)कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे. जालना पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, तपास अधिक गतीने सुरू आहे. या कटामागे बीड जिल्ह्यातील परळीतील एका बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पोलिस याबाबत सर्व दिशांनी कसून तपास करत आहेत.दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर मोठा खुलासा करणार आहेत. ते सुपारी देणाऱ्या त्या बड्या नेत्याचे नाव जाहीर करतील का, की प्रकरणाला वेगळेच वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. हत्येचा(murder) कट रचल्या प्रकरणी ते मोठा गौप्यस्पोट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गुरुवारी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप समोर आला आहे. या कटामागे एका बड्या नेत्याचा हात असल्याचीही चर्चा असून, यासंदर्भात मनोज जरांगे पाटील(murder) आजच्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर मराठा समाजात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणातील कट रचणारे व मुख्य सूत्रधार यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी धाराशिव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

हेही वाचा :
मटकी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
जगावर मोठं संकट! आता भयंकर युद्ध होणार
दमदार बुलेट, 650cc इंजिन, किंमत, फीचर्स जाणून घ्या