आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेतात. सगळ्यांचं फिट आणि स्लिम राहायचे आहे. पण जीवनशैलीत कळत नकळत होणाऱ्या चुकांमुळे वजन वाढू लागते. वजन(weight) वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम केला जातो तर कधी डाएट, हेल्दी ड्रिंक, सप्लिमेंटन्स इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होऊन होत नाही. अशावेळी आहारात वेगवेगळ्या बियांचे सेवन करावे.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भोपळ्याच्या बियांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भोपळ्याच्या बिया शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत. यामध्ये प्रथिने, गुड फॅट्स, मॅग्नेशियम आणि झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. भोपळ्याच्या बिया नियमित खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच हाडांचे आरोग्य सुद्धा निरोगी राहते. भोपळ्याच्या बिया तुम्ही नुसत्याच सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया भोपळ्याच्या बियांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
भोपळ्याच्या बिया
लसूण
कढीपत्ता
सुक खोबर
मीठ
लाल तिखट
गूळ
कृती:
भोपळ्याच्या बियांची चटणी बनवण्यासाठी, कढई गरम करून त्यावर भोपळ्याच्या (weight)बिया हलक्याशा गरम करून घ्या. त्यानंतर बिया थंड करा.कढईमध्ये लसूण पाकळ्या, सुकं खोबर, कढीपत्त्याची पाने, लाल सुक्या मिरच्या मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.गरम करून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्याशिवाय चटणी बनवू नये. यामुळे पदार्थाची चव खराब होण्याची जास्त शक्यता असते.मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, गूळ पावडर घालून बारीक चटणी वाटून घ्या.तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भोपळ्याची चटणी. हा पदार्थ गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता.

हेही वाचा :
BMC Election साठी भाजपनं कंबर कसली; नवा पॅटर्न, नवी चाल…
अतिशय अश्लील आणि…, मलायका अरोराचा डान्स पाहून सर्वत्र संतापाची लाट
सोनं १०,००० तर चांदी २१,००० नी झालं स्वस्त…