दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण (cheaper)होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दिवाळीच्या सणात रेकॉर्डब्रेक पातळीवर पोहोचलेले सोनं आणि चांदीचे दर आता सतत खाली येत आहेत. गेल्या १४ दिवसांपासून जवळपास रोजच या मौल्यवान धातूंच्या दरात घट होत असून, फक्त काही दिवसच दर स्थिर राहिले आहेत.इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या आकडेवारीनुसार, १७ ऑक्टोबरपासून आतापर्यंत देशांतर्गत बाजारात सोनं सुमारे ₹10,774 ने स्वस्त झाले आहे. त्या दिवशी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,30,874 होता, तर सध्या तो ₹1,20,100 च्या आसपास आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात जवळपास ₹570 ची दररोजची घट पाहायला मिळाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरील आकडेवारीनुसार, ५ डिसेंबर एक्सपायरी डेट असलेल्या 10 ग्रॅम सोन्याच्या वायदा किंमती ₹1,27,000 वरून ७ नोव्हेंबरपर्यंत ₹1,21,038 पर्यंत खाली आल्या आहेत — म्हणजे केवळ दोन आठवड्यांत सुमारे ₹5,970 ची घसरण.चांदीबाबत बोलायचं झालं तर परिस्थिती आणखी नाट्यमय आहे. IBJA च्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबरला 1 किलो चांदीचा दर ₹1,69,230 इतका होता, जो आता ₹1,48,275 पर्यंत खाली आला आहे. म्हणजेच केवळ 14 दिवसांत ₹20,955 ची घट नोंदवली गेली आहे. चांदी तिच्या उच्चांक ₹1,70,415 रुपयांवरून ₹22,626 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातील(cheaper) अस्थिरता, डॉलरची मजबुती आणि व्याजदरांबाबतच्या अंदाजांमुळे गुंतवणूकदारांचा सोनं-चांदीकडील ओघ कमी होत आहे. त्यामुळे या मौल्यवान धातूंच्या दरात अजून काही दिवस कमी-जास्तीचा कल सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :
थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या ‘या’ पेयांचे अजिबात करू नका सेवन
Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच
नगरपरिषद इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्यानं संपवलं आयुष्य