बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(dance) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण तिचं आणि रॅपर हनी सिंग याचं नवीन गाणं ‘चिलगम’ आहे. हनी सिंगच्या आगामी अल्बम ‘51 ग्लोरियस डेज’ मधील हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु, या गाण्याच्या टीझरनंतर मलायकावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली असून, वादाला उधाण आलं आहे.

गाण्याचा टीझर 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये मलायका हिचा नेहमीप्रमाणे दमदार डान्स आणि ग्लॅमरस अंदाज दिसून आला. मात्र, यंदा प्रेक्षकांना तिची परफॉर्मन्स शैली भावली नाही. अनेकांनी गाण्याच्या कोरिओग्राफीला “अश्लील” म्हटलं असून, मलायकाच्या डान्सवर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तिच्या अभिनय आणि एक्सप्रेशन्सवर संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत.
वादाची ठिणगी मात्र रेडिटवर व्हायरल झालेल्या एका BTS व्हिडीओमुळे पेटली. या व्हिडीओमध्ये मलायका जीभ बाहेर काढत हनी सिंगकडे थिरकत येताना दिसते. हा भाग विनोदी पद्धतीने सादर केला (dance)असला तरी, अनेकांनी त्याला “विवादास्पद” म्हटलं आहे. नेटकऱ्यांपैकी एका वापरकर्त्याने लिहिलं – “मलायका निक्की मिनाज बनायचा प्रयत्न करत आहे का?” तर दुसऱ्याने म्हटलं, “ती आता पूर्णपणे मर्यादा ओलांडत आहे.” काहींनी तिच्या वयाचा उल्लेख करत म्हटलं – “५० वर्षांचं वय असूनही अशा प्रकारे वागणं शोभत नाही.”
सोशल मीडियावर निर्माण झालेल्या या वादामुळे ‘चिलगम’ गाण्याचा टीझर इंस्टाग्रामवरून हटवण्यात आला, तसेच यूट्यूबवरही तो उपलब्ध नाही.वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मलायका नेहमीच चर्चेत राहिली आहे. अभिनेता अरबाज खान याच्याशी घटस्फोटानंतर तिने अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपची घोषणा केली होती. परंतु काही महिन्यांपूर्वी अर्जुनने “मी आता सिंगल आहे” असं जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा मलायकाचं खासगी आयुष्य चर्चेचा विषय बनलं आहे.वाद-विवाद, प्रेमसंबंध आणि ग्लॅमर — या तिन्ही गोष्टींमुळे मलायका अरोरा पुन्हा एकदा बॉलिवूडच्या चर्चेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

हेही वाचा :
सोनं १०,००० तर चांदी २१,००० नी झालं स्वस्त…
नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर टाकला सुतळी बॉम्ब, हादरवणारी दृश्ये अन् Video Viral
थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या ‘या’ पेयांचे अजिबात करू नका सेवन