मोबाईल(mobile) वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया — त्यांच्या रिचार्ज आणि डेटा प्लान्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोबाईल युजर्सच्या खिशावर थेट ताण येणार आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या खर्च आणि 5G नेटवर्कच्या विस्तारामुळे या कंपन्यांकडे दरवाढीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

सध्या या कंपन्यांचा प्रति युजर सरासरी महसूल ₹180 ते ₹195 दरम्यान आहे, परंतु मोठ्या कर्जामुळे त्यांना किमान ₹200 हून अधिक कमाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत रिचार्ज महाग होण्याची शक्यता व्यक्त (mobile)होत आहे.अंदाजानुसार, ₹199 चा प्लान ₹222 पर्यंत, तर ₹299 चा 2GB/दिवस प्लान ₹330–₹345 पर्यंत महाग होऊ शकतो. त्याचबरोबर 84 दिवसांचा ₹949–₹999 पर्यंत वाढलेला प्लान ग्राहकांना अधिक भारदस्त पडणार आहे.

एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांनी थेट दरवाढ करण्याऐवजी स्वस्त प्लान्स हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 5G सेवा विस्तार, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड आणि नेटवर्क मेंटेनन्ससाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. जिओ देखील त्यांचा IPO बाजारात आणण्यापूर्वी 15% दरवाढ लागू करण्याची शक्यता आहे, तर एअरटेल आणि Vi सुमारे 10% वाढ करू शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला आहे की नोव्हेंबर 2025 मध्येच दीर्घकालीन व्हॅलिडिटी असलेले प्लान रिचार्ज करून ठेवावेत, कारण यानंतर दरवाढ लागू झाल्यास त्याच सेवेसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. जर तुम्ही नियमित डेटा वापरणारे ग्राहक असाल, तर वार्षिक किंवा सहामाही प्लान्स सध्या रिचार्ज करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.दरम्यान, सरकारी कंपनी BSNL सध्या या दरवाढीपासून दूर असून, तिचे प्लान्स तुलनेने परवडणारे राहणार आहेत.

हेही वाचा :

हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….

अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास! 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *