आज जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा (krishna janmashtami)करण्यात येणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बासरीचे काही खास उपाय केल्याने जीवनातील दुःख दूर होतात आणि संपत्तीत वाढ होते.

जन्माष्टमीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. द्वापर युगात कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता असे मानले जाते. दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांची पूजा करणे, भजन गाणे इत्यादींना विशेष महत्त्व आहे. तसेच जन्माष्टमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांपासून सुटका होते आणि श्रीकृष्णाचे त्या कुटुंबावर आशीर्वाद (krishna janmashtami)राहतात, असे म्हटले जाते. त्याचसोबत या दिवशी बासरीचे काही उपाय केल्याने तुमच्या जीवनामधील दुर्दैव दूर होते. जन्माष्टमीच्या दिवशी बासरीचे कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
या उपायामुळे घरामध्ये येईल सकारात्मकता
जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये बासरी आणून ती घरातील प्रवेशद्वारावर टांगू शकता. तसेच घराच्या छतावर देखील ती टांगू शकता. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आणि व्यक्तीची होणाऱ्या त्रासापासून सुटका होते. हा उपाय केल्यामुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते आणि घरामधील नकारात्मकता दूर होते.
घरात सुख समृद्धी येण्यासाठी करा हे उपाय
जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात बासरी वाजवणारे विंड चाइम लावू शकता. जे एकमेंकावर आढळून त्यांचा गोड असा आवाज येतो. ज्यामुळे घरामधील वातावरण आल्हाददायक बनते. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. त्याचप्रमाणे घरामध्ये बासरी वाजवणारा विंड चाइम लावल्याने घरातील समस्यांपासून सुटका होते.
या उपायाने जीवनात होते प्रगती
जन्माष्टमीच्या दिवशी एक उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते आणि श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. जन्माष्टमीच्या पूजेवेळी चांदीची बनलेली एक छोटी बासरी शक्यतो अर्पण करावी. हा उपाय केल्याने करिअर आणि व्यवसायातील समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत जीवनात प्रगती होऊ शकते आणि व्यवसायातील अडथळे दूर होण्यास मदत होतात.
दुःख दूर करण्यासाठी उपाय
जर तुम्हाला वारंवार समस्या येत असतील तर बासरीत गूळ, साखर, नारळ पावडर इत्यादी भरा आणि श्रीकृष्णाच्या पूजेवेळी ते अर्पण करा. त्यानंतर पूजा करुन घ्या.
संपत्तीत वाढ करण्यासाठी उपाय
जन्माष्टमीला श्रीकृष्णांच्या पूजेसोबत बासरीची देखील पूजा करावी. त्यानंतर लहान मुलांना ती बासरी भेट म्हणून द्यावी. हा उपाय केल्याने व्यक्तीची आर्थिक संकटातून सुटका होते आणि संपत्तीमध्ये वाढ होऊ लागते. या उपायामुळे व्यक्तीला जीवनामध्ये यश मिळते.
हेही वाचा :
AI च्या मदतीने होमवर्क करणे आता शक्य नाही, कारण…
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ दिवसापासून ‘कोस्टल रोड’ २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार