२००८ साली आलेला ‘दे धक्का’ सिनेमा (Cinema)आजही प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहे. मकरंद अनासपुरेंच्या चौकोनी कुटुंबातील गंमतीजमती, सिद्धार्थ जाधवची कॉमेडी आणि सिनेमातील बालकलाकारांची शैली प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. या सिनेमातील सायलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री गौरी वैद्ये आज कुठे आहे आणि तिचं जीवन कसं बदललं आहे, हे जाणून घेणं मनोरंजक ठरेल.

सिनेमात गौरीने सायलीची (Cinema)भूमिका साकारली होती; सायली ही नृत्यकलेत हुशार मुलगी होती आणि तिचं गाणं ‘उगवली शुक्राची चांदणी’ खूप गाजलं. गौरीने मकरंद अनासपुरेंच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेल्या सक्षम कुलकर्णीसोबत अनेक मनोरंजक दृश्ये सादर केली.

आज गौरी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचं बदललेलं रूप पाहून अनेकांना तिची ओळख पटणे कठीण होतं. शिक्षणाच्या बाबतीत गौरीने माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमधून इंजिनिअरिंग आणि कंप्यूटर टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतलं. अभिनयाच्या करिअरच्या शिखरावर असतानाही गौरीने अभिनयापासून ब्रेक घेतला आणि स्वतःला शिक्षण आणि इतर क्षेत्रात गुंतवलं.
अभिनयापासून दूर असली तरी गौरी अजूनही डान्समध्ये व्यस्त आहे. तिची नृत्याची आवड आजही तितकीच तीव्र असून, यामध्ये तिने स्वतःला पूर्णपणे गुंतवले आहे. ‘दे धक्का’ मधील सायली आज प्रत्यक्ष आयुष्यात नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आहे, आणि तिच्या नृत्याने ती अजूनही चाहत्यांना प्रभावित करत आहे.

हेही वाचा :
भरधाव वेगात बाईक पळवली, मग हवेत उचलली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
Parle G बिस्किटाच्या पॅकेटवरील मुलीचं रहस्य 60 वर्षांनी उघड; कोण आहे ती?