महायुतीत (Mahayuti)अंतर्गत नाराजी आणि फोडाफोडीच्या चर्चांना आता अधिकृत रंग मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी थेट मंचावरून दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “शिवसेना, भाजप आणि एनसीपीमध्ये अलिखित करार आहे, मात्र संभाजी नगरात काही जण पैशांच्या बळावर राजकारण करत आहेत. फोडाफोडीचे राजकारण आता थांबवले नाही तर आम्हालाही पाऊल उचलावे लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

शिरसाटांनी सांगितले की, फुलंब्री, गंगापूर, वैजापूरसह अनेक ठिकाणी समन्वयाऐवजी गोंधळ आणि गटबाजी वाढत आहे. “महायुतीत असेच सुरु राहिले तर निवडणुका लढवणे कठीण होईल. Action असेल तर Reaction नक्की असेल,” असे ते म्हणाले.फडकरी राजकारण आणि पक्षांत फेरबदलांवरही(Mahayuti) त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपवर थेट निशाणा साधला. “आम्ही भाजपचे लोक घेत नाही, मग त्यांनी आमचे तोडणे कितपत योग्य? लोक ऑप्शन शोधतात, म्हणजे प्रवेश द्या असा अर्थ होत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या विकासावरील वक्तव्यालाही त्यांनी उत्तर दिले. “अजित दादा अर्थमंत्री आहेत, पण मुख्यमंत्री हे सर्वात मोठे. विकासाच्या आड कुणीही येऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित निकालाबद्दल बोलताना त्यांनी “निर्णयानंतर निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे मत व्यक्त केले.घराणेशाहीच्या आरोपांवर ते म्हणाले — “हो, घराणेशाही पसरली आहे. पण लोकशाहीत जनता ठरवते. नाव ठेवण्यात काही अर्थ नाही.”शेवटी धनंजय मुंडेंवर थेट टिप्पणी करण्याऐवजी त्यांनी व्यंगात्मक शैलीत म्हटलं — “बीडची बातमी नाही आली तर पेपर वाचल्यासारखं वाटत नाही.”या भाषणानंतर महायुतीतील अंतर्गत दुविधा, तणाव आणि सत्तासंघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता शिंदे गट, भाजप आणि एनसीपी (अजित पवार) यांच्याकडून या इशाऱ्याला काय प्रतिसाद मिळतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

60 वर्षाची गर्लफ्रेंड 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडकडे एकच मागणी करत होती…

पॅन आणि बँक खाते लिंक कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या

कर्जदारांसाठी आनंदाची बातमी! तुमच्या कर्जाचा EMI कमी होणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *