प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजारोहणाच्या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत शिक्षण व्यवस्थेत मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. लॉर्ड मॅकाले यांच्या शिक्षण पद्धतीवर टीका करत त्यांनी भारताला “मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचे” आवाहन केले. त्यामुळे देशात लवकरच नवीन राष्ट्रीय शिक्षण(education) पद्धती लागू होणार का? या चर्चेला वेग आला आहे.समारंभादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०३५ मध्ये मॅकालेच्या शिक्षण पद्धतीला २०० वर्षे पूर्ण होणार आहेत. येत्या दहा वर्षांत भारताला मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचे ध्येय आपण ठेवले पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मॅकालेच्या शिक्षण पद्धतीने भारतीयांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण केली. भारत स्वतंत्र झाला, संविधान लिहिले गेले, परंतु “विदेशी गोष्टी सर्वोत्तम आणि (education)भारतीय गोष्टी कमी दर्जाच्या” असा विचार जनमानसात रुजला, ही शोकांतिका आहे.त्यांनी दावा केला की भारतीय संस्कृती, विचार आणि लोकशाहीशक्तीला जाणूनबुजून इतिहासातून दूर ठेवण्यात आले.
मोदी यांनी भारतीय नौदलाच्या ध्वजातील बदलाची आठवण करून दिली. पूर्वीचा ध्वज ब्रिटिश प्रतीकांवर आधारित होता, पण आता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजप्रेरणेवर आधारित आहे. ही केवळ डिझाइनची नाही तर मानसिक परिवर्तनाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.मोदी पुढे म्हणाले, “राम म्हणजे आदर्श, शिस्त, संवाद, सामर्थ्य आणि सत्याचा संगम आहे. भारताला विकसित करायचे असेल तर राममूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा :
महायुतीतल्या वादावर एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान, केले 2 मोठे गौप्यस्फोट!
स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? तब्येतीबाबत मोठे अपडेट समोर
DJ वर थिरकली आज्जींची कंबर, जबरदस्त फ्लिपसह केला असा डान्स… पाहून सर्वच झाले घायाळ; Video Viral