आजकाल व्हॉट्सअ‍ॅप फक्त मेसेजेससाठी नाही, तर लाखो लोक रोज व्हॉइस(WhatsApp)आणि व्हिडीओ कॉल्स करतात. ऑफिस मीटिंग, कौटुंबिक गप्पा किंवा अभ्यासाच्या चर्चा सगळेच यावर होतात. पण एक मोठी समस्या आहे की व्हॉट्सअॅपमध्ये स्वतःचे कॉल रेकॉर्डिंगचे बटनच नाही. मेटा कंपनी सांगते, आमचे कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत, म्हणून बिल्टइन रेकॉर्डिंग दिल्यास गोपनीयतेला धोका होईल. त्यामुळे अनेकजण थर्डपार्टी अॅप्स वापरतात, पण त्यात हॅकिंगचा आणि डेटा चोरीचा धोका खूप असतो.

पण चिंता करू नका. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एकदम सोपी (WhatsApp)आणि पूर्ण सुरक्षित ट्रिक आहे फोनचे इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डिंग. यासाठी एकही एक्स्ट्रा अॅप डाउनलोड करायचे नाही. फक्त स्क्रीन रेकॉर्डर चालू करा, स्पीकर ऑन करा आणि व्हॉट्सअॅप कॉल करा स्क्रीन आणि आवाज दोन्ही परफेक्ट रेकॉर्ड होतील.

WhatsApp Call Recording Android, Record WhatsApp Calls Without App, Screen Recorder Trickव्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंग कसे करायचे? (how to do WhatsApp Call Recording)फोनच्या वरून खाली स्वाइप करून क्विक सेटिंग्ज पॅनल उघडा.“Screen Record”, “Screen Recorder” किंवा (WhatsApp)“स्क्रीन रेकॉर्डिंग” असा पर्याय शोधा (सॅमसंग, शाओमी, रियलमी, ओप्पो प्रत्येक ब्रँडमध्ये नाव थोडे वेगळे असते.

रेकॉर्डिंग सुरू करा, व्हॉट्सअॅप कॉल स्पीकरवर घ्या आणि बोलायला सुरुवात करा
झालं..कॉल संपल्यावर रेकॉर्डिंग आपोआप गॅलरीत सेव्ह होईल. (WhatsApp)आवाज स्पष्ट येण्यासाठी स्पीकर मोड गरजेचा आहे.WhatsApp Call Recording Android, Record WhatsApp Calls Without App, Screen Recorder Trick

आयफोनवाल्यांसाठी मात्र वाईट बातमी आहे…अॅपलच्या कडक नियमांमुळे iOS मध्ये स्क्रीन रेकॉर्डर व्हॉट्सअॅप कॉलचा आवाज कॅप्चर करू शकत नाही. थर्डपार्टी अॅप्सही काम करत नाहीत. त्यामुळे आयफोनवर व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करणे सध्या जवळपास अशक्य आहे.

पण एक गोष्ट अलर्ट मोड वर राहून लक्षात ठेवा. (WhatsApp)कॉल रेकॉर्डिंग करताना दुसऱ्या व्यक्तीची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात आणि जगातील अनेक देशांमध्ये परवानगीशिवाय रेकॉर्डिंग करणे बेकायदेशीर ठरू शकते. म्हणून ही सुविधा फक्त कायदेशीर आणि नैतिक कारणांसाठीच वापरा. तर मग आजच अँड्रॉइडवर ही ट्रिक वापरुन बघा.

हेही वाचा :

झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा

ठाकरे गटात मोठा भूकंप?

‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशारा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *