राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसाठी ई-केवायसी प्रक्रिया (Problems)अनिवार्य करण्यात आली. महिलांना मोठ्या संख्येने वेळेत ई-केवायसी करता यावी, म्हणून सरकारने मुदतवाढ देत ती ३१ डिसेंबर केली, तरी प्रत्यक्षात लाभार्थींना अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे वाढीव मुदतीचा लाभ अपेक्षित प्रमाणात होताना दिसत नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेत हजारो महिलांना दरमहा दिला जाणारा आर्थिक आधार मोठी मदत ठरत आहे. मात्र, ई-केवायसी ‘अपडेट’ करण्यासाठी संकेतस्थळावर अडथळे येत आहेत.

काही भागात सर्व्हर डाऊन राहणे, ‘ओटीपी’ न येणे, आधार-पडताळणी (Problems)प्रक्रिया वारंवार फेल होणे, दस्तऐवज ‘अपलोड’ न होणे अशा समस्या नोंदवल्या जात आहेत. गावपातळीवरील सुविधा केंद्रांवरही दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि वेळेअभावी अर्जदारांना परत जावे लागत आहे.

सुविधा केंद्रात गेल्यावरही काम होत नाही. दिवसातून दोन-तीन वेळा प्रयत्न(Problems) करूनही ई-केवायसी होत नाही, अशी तक्रार लाभार्थी महिलांची आहे. कोणत्याही लाभार्थीचे पैसे थांबू नयेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत असले तरी तांत्रिक यंत्रणा सुरळीत न चालल्याने तक्रारी वाढत आहेत. वाढीव मुदतीत सर्वांना प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची गरज आहे.

हेही वाचा :

विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी

३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *