तुम्ही इंस्टाग्राम युजर आहात का? इंस्टाग्राम स्टोरीवर तुम्ही देखील छोटे छोटे (Resharing)अपडेट शेअर करत असता का? तुम्हाला देखील सर्व गोष्टी तुमच्या फॉलोवर्ससोबत शेअर करायला आवडतात का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने इंस्टाग्राम स्टोरीसाठी एक खास फीचर सादर केलं आहे. कंपनीने स्टोरी फॉरमॅटमध्ये एक मोठा बदल केला आहे. आता युजर्स कोणत्याही पब्लिक अकाऊंटवरील स्टोरी त्यांच्या अकाउंटवर रिशेअर करू शकणार आहेत. म्हणजेच जरी समोरील व्यक्तीने तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीला मेंशन केलं नसेल आणि त्या व्यक्तीचे अकाऊंट पब्लिक असेल तरी देखील तुम्ही संबंधित व्यक्तीच्या अकाऊंटवरील स्टोरी तुमच्या अकाऊंटवर रीशेअर करू शकणार आहात. त्यामुळे आता युजर्स कोणत्याही पब्लिक अकाउंटवरील स्टोरी अगदी सहज त्यांच्या अकाऊंटवर रिशेअर करू शकणार आहेत.

यापूर्वी जेव्हा एखादा युजर तुम्हाला त्यांच्या स्टोरीला ‘@’ मेंशन करायचा तेव्हाच तुम्ही ती स्टोरी तुमच्या अकाउंटला शेअर करू शकत होतात. मेंशन केल्याशिवाय कोणत्याही युजरची स्टोरी (Resharing)आपल्या अकाऊंटला शेअर करणं कठीण होतं. काही युजर्स अशावेळी त्या युजर्सच्या अकाऊंटच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट काढायचे किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगची मदत घ्यायची. मात्र यामुळे क्वालिटी खराब व्हायची. मात्र आता असं होणार नाही. कारण आता युजर्स थेट कोणत्याही मेंशनशिवाय त्यांच्या अकाऊंटवर स्टोरी शेअर करू शकणार आहे. नव्या फीचरमुळे हे काम अत्यंत सोपे झाले आहे.
सोप्या शब्दांत सागांयचे झाले तर हे फीचर पब्लिक प्रोफाइल्ससाठी उपलब्ध असणार आहे. म्हणजेच यूजर्स केवळ पब्लिक अकाउंट्सच्या स्टोरिज रिशेअर करू शकणार आहेत. त्यामुळे हे फीचर प्रायव्हेट अकाऊंटसाठी उपलब्ध नसेल. प्रायव्हेट अकाऊंटवरील स्टोरी पूर्णपणे सुरक्षित असणार आहेत.(Resharing)स्टोरी ओपन केल्यानंतर तुम्हाला शेअर पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे आणि इथे तुम्हाला प्लस चिन्हासह अॅड टू स्टोरीचा ऑप्शन दिसणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही संबंधित स्टोरी तुमच्या अकाऊंटला रिशेअर करू शकणार आहात. या फीचरच्या मदतीने तुम्ही स्टोरी रिशेअर केल्यानंतर तुमच्या स्टोरीवर देखील ओरिजिनल क्रिएटरचे यूजरनेम दिसणार आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या रिशेअर केलेल्या स्टोरीवर क्लिक केलं तर थेट ओरिजिनल क्रिएटरचे अकाऊंट ओपन होणार आहे.

पब्लिक अकाऊंटवरील प्रत्येक यूजरची स्टोरी शेअर केली जाईल, (Resharing)असं नाही. कारण प्रत्येक यूजरला त्याची स्टोरी कोणी दुसऱ्या व्यक्तीने शेअर केलेली आवडणार नाही. यासाठी देखील इंस्टाग्रामने बंदोबस्त केला आहे. म्हणजेच पब्लिक अकाऊंटवरील यूजर्स प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर बंद करू शकणार आहेत. यासाठी यूजर्सना प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन अलाऊ शेअरिंग टू स्टोरी ऑप्शन बंद करावा लागणार आहे. हे फीचर बंद केल्यानंतर दुसरे यूजर्स तुमची स्टोरी केवळ पाहू शकणार आहे, पण त्यांच्या अकाऊंटला रिशेअर करू शकणार नाहीत.
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता